20/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

‘जॅंगो जेडी’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित 

Share Post

मराठीत नेहमीच नवनवीनविषयांवर आधारीत चित्रपटांची निर्मिती केली जाते. आशयघन कथानकाला कसदार अभिनयाचीजोड देत दर्जेदार निर्मिती करणं हे जणू आज मराठी सिनेमांचं समीकरणच बनलं आहे. याचसमीकरणाला साजेसा असलेला आणखी एक मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणारआहे. जॅंगो जेडी असं शीर्षक  असलेल्या या मराठी चित्रपटाचं पहिलं पोस्टर सोशलमीडियाच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात आलं आहे. फिल्म मिल प्रा.लि.प्रॉडक्शन्स याबॅनरखाली रोहित भागवत आणि हरदीप सचदेव यांनी या चित्रपटाचीनिर्मिती केली आहे. हरदीप सचदेव यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. एखाद्या सुरेखचित्राप्रमाणं भासावं असं जॅंगो जेडीचं लक्ष वेधून घेणारंमनमोहक पहिलं पोस्टर रसिकांच्या भेटीला आलं आहे. मुंबई शहराच्या पार्श्वभूमीवरनायक आणि नायिकेची रोमँटिक जोडी पोस्टरवर पहायला मिळते. या सिनेमात एक प्रेमकहाणी पहायला मिळणार असल्याचेही संकेत या पोस्टरवरूनमिळतात. चित्रपटाचं शीर्षक जॅंगो जेडी असं का ठेवण्यात आलंय? याचंउत्तर पोस्टरमध्ये नसलं तरी चित्रपटात नक्कीच मिळणार आहे. प्रेमकथेच्या अनुषंगानंइतरही काही विषयांना या चित्रपटात स्पर्श करण्यात येणार असल्याचा अंदाजहीशीर्षकावरून येतो. पोस्टर मधली ‘तुमच्यातला नायक’ही टॅग लाइन दर्शवते की ही सर्वसामान्य तरुणाची नायक बनण्याची गोष्ट आहे.हरदीप सचदेव यांनी या चित्रपटाचं अतिशय अभ्यासपूर्ण दिग्दर्शन केलंअसल्यानं काहीशी नावीन्यपूर्ण गोष्ट जॅंगो जेडी मध्ये पहायला मिळणार आहे. चित्रपटात गौरीनलावडे, अभिनव सावंत सोबत आदित्य आंब्रे, योगेशसोमण, डॉ. निखिल राजेशिर्के, वरुणपनवार इ.कलाकारांच्या देखील महत्वपूर्ण भूमिका आहेत.  दिग्दर्शक हरदीप सचदेव यांनी यापूर्वी ‘लगान’ आणि ‘दिल चाहता है’ सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये परिणामकारक योगदानदिले असल्याने, जॅंगो जेडी या चित्रपटकडून अपेक्षा उंचावल्या आहेत.