जुन्या संसद भवनाचे नामकरणराष्ट्रपिता महात्मा गांधी विश्वशांती भवन करावे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र
आंतरराष्ट्रीय शांती दिवसाचे औचित्य साधून एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या वतीने भारताच्या जुन्या संसद भवनाचे नामकरण राष्ट्रपिता महात्मा गांधी विश्वशांती भवन असे करावे. या संदर्भातील एक पत्र एमआयटी डब्ल्यूपीयूचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड व जगप्रसिद्ध संगणकतज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांच्या स्वाक्षरीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडे पाठविण्यात आले आहे. विद्यापीठातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी या संदर्भात जोरदार मागणी केली आहे.
भारतीय संस्कृती, पंरपरा, तत्वज्ञान, भारतमातेच्या स्वातंत्र्याच्या इतिहासाचे साक्षीदार, देशाच्या राजकारणाचे व स्वातंत्र्यचे ७५ वर्षे ज्यांने पाहिले अशी ही वास्तू म्हणजे जूने संसद भवन आहे. त्यामुळे या वास्तूला अहिंसेचे पुजारी राष्ट्रपिता महात्मा गांधी विश्वशांती भवन असे नामकरण करावे ही विनंती या पत्राद्वारे करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी निर्णयामुळे आज संपूर्ण विश्वात, संयुक्त राष्ट्रसंघ यूनोच्या मान्यतेने २ ऑक्टोंबर म्हणजेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने अहिंसा दिन व २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योगदिवसाच्या रूपाने साजरा करण्यात येत आहे. तसेच या संसद भवनातील इतिहासाचे जतन केल्यास या वास्तूचा सन्मान संपूर्ण विश्वात वाढेल. येणार्या काळात सृष्टीवर सत्यनिष्ठा आणि अहिंसेच्या माध्यमातून विश्वशांतीचे स्मरण होईल तेव्हा हा संवाद प्रस्तावित राष्ट्रपिता महात्मा गांधी विश्वशांती भवन मध्येच होईल. त्याच प्रमाणे या वास्तूतील सेंट्रल हॉल आणि राज्यसभा हॉलमध्ये विश्वशांती या विषयावर परिषदेंचे आयोजन करण्यात यावे.
संसद भवनाच्या बाहेर उभारण्यात आलेल्या १४४ स्तंभापैकी ७२ स्तंभांच्या जवळ १५ ते १८ फूट उंचीचे स्वातंत्र्य सेनानीचे चैतन्यमयी मुर्ती उभारण्यात यावी. यामुळे येणार्या पिढीसाठी येथील वैशवशाली इतिहास आणि परंपरेची माहिती मिळेल. अशा संदर्भातील आशयाचे एक पत्र एमआयटी डब्ल्यूपीयूचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ दा. कराड व पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांच्या स्वाक्षरीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात आले आहे.