NEWS

जीविका हेल्‍थकेअरने सुरू केली जीविका संपूर्ण टीकाकरण योजना (जेएसटीवाय)

Share Post

जीविका हेल्‍थकेअर या तळागाळाच्‍या स्‍तरावर परवडणारी, उपलब्‍ध होण्‍याजोगी व समान आरोग्‍यसेवा सिस्‍टम्‍स निर्माण करण्‍याप्रती समर्पित असलेल्‍या सामाजिक उद्योगाने आज त्‍यांचा नवीन उपक्रम ‘जीविका संपूर्ण टीकाकरण योजना (जेएसटीवाय)’च्‍या शुभारंभाची घोषणा जीविका हेल्थकेअर चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिग्नेश पटेल, जीविका हेल्थकेअरच्या सल्लागार मंडळाचे सदस्य. डॉ. राज शंकर घोष, जीविका हेल्थकेअरचे सह-संस्थापक आणि चीफ ऑपरेटिंग ऑफिसर कृणाल मेहता आणि अभिनेत्री अलका कुबल याच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी क्सीनऑनव्हील्स चे वरिष्ठ व्यवस्थापक अंकित सिंग सह अन्य मान्यवर उपस्थित होते. हा उपक्रम सरकारी लसीकरण उपक्रमांतर्गत नसलेल्‍या लसींना अत्‍यंत किफायतशीर दरामध्‍ये उपलब्‍ध करून देत मुलांचे संपूर्ण लसीकरण पूर्ण होण्‍याची खात्री घेतो. हा अग्रगण्‍य प्रकल्‍प टायफॉइड, हिपॅटायटीस-ए, इन्फ्लूएन्झा, मेनिन्गोकोकल आणि चिकन पॉक्स या पाच लस-प्रतिबंधक आजारांविरुद्ध ९ वर्षांपर्यंतच्या मुलांना महत्त्वाच्या लस देण्यावर लक्ष केंद्रित करेल.

जीविका संपूर्ण टीकाकरण योजना (जेएसटीवाय)चे सादरीकरण सामुदायिक पातळीवर या आजारांविरोधात लढण्‍यामधील प्रमुख पुढाकार असेल. ही योजना मुलांचे जीवन व भविष्‍याचे संरक्षण करण्‍यास मदत करते, परिणामत: त्‍यांच्‍या शारीरिक व मानसिक विकासामध्‍ये अडथळे निर्माण करणारे गंभीर धोके कमी होतील. या उपक्रमाच्‍या माध्‍यमातून जीविका हेल्‍थकेअर सरकारच्‍या लसीकरण मोहिमेला पाठिंबा देण्‍याप्रती समर्पित असलेली अद्वितीय खाजगी हेल्‍थकेअर सेवा प्रदाता आहे. या उपक्रमाद्वारे पालक प्रथम मोफत सरकारी लसीकरणांना प्राधान्‍य देत असल्‍याची आणि त्‍यानंतर त्‍यांच्‍या मुलांची जेएसटीवायसाठी नोंदणी करत सरकारी केंद्रांमध्‍ये उपलब्‍ध नसलेल्‍या या अतिरिक्‍त लसींचा फायदा घेत असल्‍याची खात्री घेण्‍यात येईल. या उपक्रमाचा एकूण लसीकरणाचे प्रमाण वाढवण्‍याचा, तसेच व्‍याजमुक्‍त मासिक हप्‍त्‍यांच्‍या माध्‍यमातून अत्‍यावश्‍यक आर्थिक साह्य प्रदान करण्‍याचा उद्देश आहे. हा उपक्रम महाराष्‍ट्रातील पुणे येथील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेपासून सुरू होईल, जो व्‍यापक लसीकरण उपलब्‍धतेमध्‍ये परिवर्तन घडवून आणण्‍याच्‍या दिशेने जीविका हेल्‍थकेअरचा पहिला पुढाकार असेल. महाराष्‍ट्रातील सर्वात मोठी खाजगी लसीकरण साखळी जीविका हेल्‍थकेअरने पुण्‍यामध्‍ये १०० लसीकरण क्लिनिक्‍स लॉन्‍च केले आहेत, ज्‍यामुळे कुटुंबांना व समुदायांना सुलभपणे लसीकरण उपलब्‍ध झाले आहे. विचारशील विस्‍तारीकरण योजनेला पुढे घेऊन जात हा उपक्रम राज्‍यातील इतर प्रदेशांमध्‍ये, तसेच देशभरात विस्‍तारित होण्‍यास सज्‍ज आहे.


जीविका संपूर्ण टीकाकरण योजनेच्या मिशनवर अधिक भर देत मराठी चित्रपटसृष्‍टीतील दिग्‍गज अभिनेत्री श्रीमती अलका कुबल यांनी या महत्त्वपूर्ण उपक्रमाबाबत जागरूकतेचा प्रसार करण्‍यासाठी मोहिमेचा चेहरा व आवाज म्‍हणून सहयोग केला आहे. एक प्रभावक म्‍हणून त्‍यांचे समर्थन लसीकरणाबाबत महत्त्वपूर्ण संदेशाचा प्रसार करतो, ज्‍यामधून कोणतेही मूल लसीकरणापासून वंचित राहणार नाही याप्रती कंपनीची अविरत कटिबद्धता दिसून येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *