जावडेकर यांच्या खासदार निधीतून दहा खुल्या व्यायामशाळा
प्रकाश जावडेकर यांच्या खासदार विकास निधीतून सरस्वती विद्यामंदीर प्रशाला आणि अभिजात एज्युकेशन सोसायटीला खुल्या व्यायामशाळेचे साहित्य देण्यात आले. या व्यायामशाळांचे उद्घाटन नुकतेच जावडेकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सरस्वती विद्यामंदीरचे अध्यक्ष विनायक आंबेकर, अविनाश नाईक, सुधीर चौधरी, दिलीप बोकील, श्रीनिवास खंडेलवाल, प्रा. ए. पी. कुलकर्णी, अभिजात एज्युकेशन सोसायटीचे अमला भागवत, सुप्रिया पालकर, पूर्वा म्हाळगी यांची प्रमुख उपस्थिती होती.जावडेकर म्हणाले, ‘शरीर आणि मन चांगले राहाण्यासाठी खासदार निधीतून दहा शाळांमध्ये खुल्या व्यायामशाळा बसविल्या, आणखी काही शाळांमध्ये बसविणार आहे. कारण मुलांनी खेळणे पाहिजे, धावले पाहिजे, व्यायाम केला पाहिले भारताला पुढे नेणारा हा मंत्र आहे. पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या कल्पनेतील ‘फिट इंडिया’ उपक‘माअंतर्गत थोड्याच दिवसात देशाची ङ्गिटनेस लेव्हल वर जाईल. मोदींनी जे स्वप्न पाहिले तशी खेळात आपली प्रगती होईल, खूप पदके आणणारा देश होईल, त्याची सुरुवात झाली आहे. देश खेळतो कसा यावरही देशाची प्रगती अवलंबून असते.’