जागतिक मराठी संमेलन अमेरिकतील संसद सदस्य व उद्योजक श्रीनिवास ठाणेदार यांचा दि.२२ फेब्रुवारी रोजी मा. शरद पवार यांच्या हस्ते सत्कार
जागतिक मराठी अकादमी आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि. २२ फेब्रुवारी २०२३ रोजी अमेरिकन संसदेचे नवनिर्वाचित पहिले मराठी खासदार व उद्योजक मा. श्री. श्रीनिवास ठाणेदार यांना जागतिक मराठी भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे .बुधवार दिनांक २२ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता डॉ डी. वाय. पाटील विद्यापीठ प्रेक्षागृह ,संत तुकाराम नगर ,पिंपरी येथे होणाऱ्या कार्यक्रमात पद्मविभूषण मा. शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते मा. श्रीनिवास ठाणेदार यांना सन्मानित करण्यात येणार असून डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ.पी.डी.पाटील आणि इतर मान्यवरांच्या उपस्थित हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील यांना निमंत्रित केले आहे. मूळचे बेळगावचे असणारे मा. श्रीनिवास ठाणेदार यांनी अमेरिकेत आपल्या कर्तृत्वाचा डंका वाजवलेला आहे. ही बाब आपल्या महाराष्ट्रासाठी अभिमानस्पद अशीच आहे. गरीबीमधून आणि प्रतिकूल परिस्थितीतुन पुढे येत मा.ठाणेदार यांनी आपलं विश्व उभं केलेलं आहे. त्यांचा जीवनप्रवास या कार्यक्रमात आयोजित केलेल्या मुलाखतीमध्ये उलगडणार आहे. एक यशस्वी उद्योजक ते अमेरिकन संसदेत डेमाॅक्रेटिक पक्षाचे खासदार असा त्यांचा प्रेरणादायी प्रवास आहे. नागपूरला ४ ते ६ जानेवारी २०१९ या काळात भरलेल्या जागतिक मराठी संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे. त्यांचे ‘ही श्रींची इच्छा’ हे आत्मचरित्र लोकप्रिय ठरले आहे.