17/07/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

जय गुरुदेव ग्रेनाइट्स एवं मार्बलचे कोंढवा गंगाधाम येथे शोरूम सुरु

Share Post

ग्रेनाइट्स एवं मार्बलसाठी प्रसिध्द असलेले जय गुरुदेव ग्रेनाइट्स एवं मार्बलचे कोंढवा गंगाधाम येथे शोरूम सुरु करण्यात आले आहे. जय गुरुदेव ग्रेनाइट्स एवं मार्बलचे संचालक महेंद्र गोयल, ऋषभ गोयल यांचे शोरूम असून शुभारंभास आमदार योगेश टिळेकर आणि मित्तल ग्रुपचे नरेश मित्तल, नरेंद्र गोयल, ब्रदहुड फाऊंडेशनचे पवन जैन, पवन बन्सल, चेतन टिळेकरआदी उपस्थित होते. गेल्या 20 वर्षापासून या क्षेत्रात असून आंबेगाव येथे ग्रेनाइट्स एवं मार्बलचे शोरूम होते. नागरिकांच्या आग्रहखातर कोंढवा गंगाधाम येथे एक एकर मध्ये शोरूम सुरु करण्यात आले असल्याची माहिती ऋषभ महेंद्र गोयल यांनी दिली.

महेंद्र गोयल म्हणतात, हॉटेल्स, मॉल्स, रिसॉर्ट्स, ऑफिस इत्यादी व्यावसायिक रिअल्टीमध्ये ग्रेनाइट आणि मार्बलचा वापर केला जात आहे. त्याचप्रमाणे आजच्या युगात आलिशान घरांसाठी ब्रँडेड इटालियन मार्बल, ग्रेनाइट्स, क्वार्ट्ज, स्टोन, टाइल्स, मार्बल, क्लॅमशेल सॅनिटरीवेअर, बाथरूम फिटिंग्जची मागणी वाढली आहे. त्यामुळेच जय गुरुदेव ग्रेनाइट्स एवं मार्बलचा विस्तार करण्यात आला आहे. या शोरुम मध्ये भारतातील प्रसिध्द ब्रँड सह आंतरराष्ट्रीय ब्रँडच्या जागतिक दर्जाच्या टाइल्स सिरॅमिक, मार्बल आणि सॅनिटरी वेअर्स उपलब्ध करून दिल्या आहेत. येथे ब्रँडेड इटालियन मार्बल्स, ग्रेनाइट्स, क्वार्ट्ज, स्टोन्स, टाइल्स, मार्बल्स, सीपी सॅनिटरीवेअर, बाथरूम फिटिंग्ज उपलब्ध आहेत. अहमदाबाद आणि राजस्थान येथे आमची स्वत: मॅन्युफॅक्चरींग कंपनी आहे. तेथूनच सर्व प्रकाराचे ग्रेनाइट्स एवं मार्बल येते. नॅच्युल ग्रेनाइट्सची आमची खासियत आहे. मार्बल ग्रेनाइट्स उत्कृष्ट दर्जाचे आमच्या कंपनी बनविले जाते आणि त्याची मागणी ही खुप आहे असे ही ऋषभ महेंद्र गोयल म्हणाले. 2000 स्क्वेअरचे शोरूम असून येथे विविध कंपनीचे प्रोडक्ट असून 40 फूट पासून ते सुामरे 2000 फुट रुपयांपर्यतचे प्रोडक्ट आहेत.