“जंगल महल द अवेकनिंग” चित्रपट 13 जानेवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित
ए सी प्रोडक्शन्स निर्मित “जंगल महल द अवेकनिंग” हा पहिलाच चित्रपट श्री अरुणवा चौधरी यांनी दिगदर्शित केलेला आहे, तसेच हा भारतीय चित्रपट आहे ज्याने जागतिक चित्रपट फेस्टिवल मध्ये “उत्कृष्ट चित्रपट ” म्हणून मानांकन मिळवले आहे. हा चित्रपट ८० च्या दशकातील आणि नक्षलवादांच्या उठावादरम्यान पावसाळ्यातील सत्य घटनेवर आधारित आहे . हा संपूर्णतः हॉरर चित्रपट आहे .
या चित्रपटामध्ये मुख्य कलाकार – मासोमेह एबी , आदित्य बालियान, अमित रैना , फरहाद , सुरैया परवीन आणि प्रशांत शिंदे यांचा समावेश आहे.
या चित्रपटाचे पोस्ट प्रोडक्शन जर्मनी, पोर्तुगाल, स्पेन , ब्राझील आणि यू एस ऐ मध्ये हॉरर प्रकारातील काही उत्कृष्ट व्यावसायिकांनी केली आहे .
तसेच हा चित्रपट १३ जानेवारी २०२३ ला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे