‘घालीन लोटांगण’ गीत ऐका आता भैरवी रागात
पुण्यातील युवा संगीतकार ओजस चोपडे यांनी निर्मिती केलेल्या ‘घालीन लोटांगण ‘ या गाण्याच्या मिश्र भैरवी रागातील वर्जन चे प्रकाशन आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात करण्यात आले. यावेळी ओजस चोपडे, गायक श्री दिगंबर गाडगीळ यांच्यासह संपूर्ण टीम उपस्थित होती. या गाण्याबद्दल बोलताना ओजस चोपडे म्हणाले, ‘घालीन लोटांगण’ च्या ऑडिओचे आज आम्ही प्रकाशन केले, लवकरच या गाण्याचा व्हिडिओ येणार आहे. आपल्याककडे लोकसंगीतात अनेक गाणी आहेत, ज्यांचे रूपांतर व्हिडिओ किंवा ऑडिओ स्वरूपात झालेले नाही अशी सुमारे २०० गाणी रसिकांच्या भेटीला आणण्याचा आमचा मानस आहे. ही सर्व गाणी ‘एनआरसी’ या युट्यूब चॅनलवर उपलब्ध होणार आहेत.