23/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

घर हे फक्त निवास नव्हे तर सहवास ! – अभिनेते महेश मांजरेकर यांचं प्रतिपादन लोटस फॅमिलीतर्फे ‘योजनगंधा’चा शुभारंभ

Share Post

घरातील प्रत्येक व्यक्ती हा त्या घराचा आधार असतो. त्यामुळे घरातील प्रत्येकाला जास्तीत जास्त ‘स्पेस’ देणे आणि त्याबरोबरच सुख-सुविधा देणे हे ‘लोटस ग्रुप’चं ब्रीद आहे. घर म्हणजे फक्त निवास नव्हे तर एक परिपूर्ण सहवास आहे असं आमचं मत आहे आणि त्यामुळेच आम्ही ‘योजनगंधा’मध्ये अशी घरं आमच्या ग्राहकांना देण्यास कटीबद्ध आहोत ” असं प्रतिपादन प्रख्यात अभिनेते, दिग्दर्षक व निर्माता श्री. महेश मांजरेकर यांनी व्यक्त केले. पुण्यातील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक ‘लोटस ग्रुप’ तर्फे त्यांच्या शिवतीर्थनगर,कोथरूड येथील ‘योजनगंधा’ या नियोजित गृहप्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ प्रख्यात चित्रपट निर्माते, दिग्दर्शक श्री. महेश मांजरेकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पुण्याचे माजी उपमहापौर दीपक मानकर, नगरसेवक आबा शिळमकर व मराठी चित्रपट अभिनेते राहुल सोलापूरकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच लोट्स ग्रूपचे संस्थापक संचालक सत्या प्रभा गिरी, संचालक स्मिता गिरी व व्यवस्थापकीय संचालक जगदीश घोरपडे उपस्थित होते.‘योजनगंधा’ मध्ये अनेक अनोख्या अल्ट्रामॉडर्न सुविधा देण्यात आल्या आहेत. ‘यू. आर्ट’ नावाचं कलांना समर्पित असं एक विशेष दालन इथून पुढे सर्वच ‘लोटस’ प्रकल्पांमध्ये देण्यात येणार आहे. त्यात संगीताचा विशेष भाग असणार आहे कारण संगीत माणसाच्या भावनांशी थेट जोडलं जातं. संगीत मनाला आराम देतं आणि हाच धागा पकडून ‘लोट्स फॅमिली’तर्फे याप्रसंगी संगीत-संध्येचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी मराठी व हिंदी चित्रपटातील गीते, संगीत, नृत्य, विनोद यांची मुक्त उधळण होती आणि लोकप्रिय आर. जे. बंड्या याने घेतलेली

श्री.महेश मांजरेकर यांची विशेष मुलाखत या कार्यक्रमाला एक वेगळ्याच उंचीवर घेऊन गेली.महेश मांजेकर म्हणाले,” घर म्हणजे केवळ चार भिंती, एक छप्पर येवढच मर्यादित नसतं. त्यात आपल्या इच्छा, आकांक्षा, स्वप्न, भावना आणि इतरही गोष्टींचं वास्तुरूप प्रतिबिंबही असतं.”‘लोटस’चे संचालक श्री.सत्या प्रभा गिरी म्हणाले,” केवळ निवास नव्हे तर परिपूर्ण सहवास असलेला हा अल्ट्रा मॉडर्न गृहप्रकल्प कोथरूडसारख्या शहराच्या मध्यवस्तीत असून येथे १२० सदनिकांची, ज्यात 2,3,आणि 4 bhk सदनिकांचा समावेश आहे. पारदर्शक आणि ग्राहकाभिमुख व्यवहार, गुणवत्तापूर्ण बांधकामाबरोबरच सर्व अत्याधुनिक सुविधांनी युक्त असलेला हा प्रकल्प ३६ महिन्याच्या आतच पूर्ण करण्याचा मानस आहे. शहरतील पार्कींग समस्या ओळखून येथे २०० स्वतंत्र पार्कींग सुविधा देण्यात येईल.”जगदीश घोरपडे म्हणाले, “बांधकाम क्षेत्रातील अत्याधुनिक सुविधांच्या उत्तम गोष्टी देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच येथे निसर्गाचा सहवास, उत्तम शिक्षणाचा सहवास, दळण वळणाच्या आधुनिकतेचा सहवास, आरोग्य संस्थांचा सहवासाबरोबरच सर्व अ‍ॅमेनिटीज देण्यात येणार आहे.”यावेळी आर.जे. बंड्या यांनी अभिनेता व दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मुलाखत घेतांना त्यांच्या येणार्‍या नवा चित्रपट, अभिनय क्षेत्रातील आव्हाणे, वृध्दांची समस्या सारख्या अनेक विषयांवर चर्चा केली. तसेच यावेळी रुद्र महाबळेश्वर या छोट्या मुलाने तयार केलेले महेश मांजरेकर यांचे स्केच त्यांना भेट दिले.यावेळी विविध क्षेत्रातील नामवंत मान्यवर आवर्जून उपस्थित होते.