गिताई ह्युमनकाईंड डेव्हलपमेंट ट्रस्टतर्फेशिवणे इंडस्ट्रीयल परिसरातील कामगारांसाठीमोफत आरोग्य शिबिरास उत्तम प्रतिसाद
पुणे, दि. २९ जानेवारीः करोनानंतर बर्याच नागरिकांच्या फुफ्फुसांची क्षमता कमी झाली. त्यातच करोना पुन्हा डोकं वर काढत आहे. अशा परिस्थितीत कंपनीत कार्यरत कामगारांची फिटनेस टेस्ट करणे गरजेचे आहे. हाच मुख्य उद्देश ठेऊन गिताई ह्युमनकाईंड डेव्हलपमेंट ट्रस्ट, पुणे आयोजित पर्यावरण शाळा, शिवणे इंडस्ट्रीयल असोसिएशन आणि जहांगीर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने कंपनीतील कामगार व परिसरातील नागरिकांकरिता विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आयोजित केलेल्या या शिबिरात फुफ्फुसांची क्षमता, हदयाची क्षमता, रक्तातील साखर, ब्लड प्रेशर, स्थूलत्व यांची तपासणी करून त्यावर जहांगीर हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी मोफत सल्ला व मार्गदर्शन केले. या शिबिराचा लाभ जवळपास शेकडों कामगार व नागरिकांनी घेतला.
या शिबिराचे उद्घाटन शिवणे इंडस्ट्रीयल असोसीएशनचे अध्यक्ष संजय भोर यांनी केले. यावेळी रामेलेक्स ग्रुपचे चेअरमन राम जोगदंड, गिताई ह्युमनकाईड डेव्हलपमेंट ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश जोगदंड, विश्वस्त माणिकराव जोगदंड, किशोर मोहोळकर आणि चंद्रशेखर मोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
अविनाश जोगदंड म्हणाले,“उद्योग क्षेत्रातील कामगारांचे आरोग्य उत्तम राहिल्यास त्यांचे कुटुंब सुखी आणि समाधानी राहू शकते. तुटपूंज पगारात ते आपल्या आरोग्यकडे योग्य लक्ष देत नाही, परिणामता आजार गंभीर स्वरूप धारण करतो. अशा वेळेसे त्यांचे आरोग्य चांगले राहिल्यास कंपनी व कुटुंब उत्तम राहते. हीच भावना ठेऊन या क्षेत्रातील कामगार व नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. ज्याला उत्तम प्रतिसाद मिळाला.”
०००००००००००००००००००००००
