NEWS

गदर 2 चित्रपटाच्या स्पेशल शो मध्ये भारत माता की चा जयघोष

Share Post

मनजितसिंग विरदी फाऊंडेशनच्यावतीने आयोजित गदर 2 चित्रपटाच्या स्पेशल शोचा श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, ससून जनरल हॉस्पिटल, पुणे कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल, फायर ब्रिगेड, पोलिस दलातील अधिकारी आणि कर्मचारी, विविध एनजीओचे कर्मचारी आणि अंतिम संस्कार करणार्या कर्मचार्यांच्या परिवारासह सुमारे 500 अधिकारी कर्मचार्यांनी आनंद लुटला. यावेळी भारत माता की च्या जयघोषाने आयनॉक्स मल्टिप्लेक्स दुमदुमले होते.
मनजितसिंग विरदी फाऊंडेशनच्यावतीने मतिमंद, अंध, अपंग, कॅन्सर, एच. आय. व्ही. ग्रस्त, अनाथ मुलांना तसेच सैन्यदलातील जवानाना गेल्या 28 वर्षापासून विविध चित्रपट दाखवत असतात. यावेळी काही अधिकारी व कर्मचार्यांनी मागणी केली की गदर-2 चित्रपट दाखविण्यात यावा म्हणून प्रथमच मोठ्या व्यक्तींना बंडगार्डन रोडवरील आयनॉक्स मल्टिप्लेक्समध्ये गदर-2 या चित्रपटाचे आयोजन करण्यात आले आले आहे असे मनजितसिंग विरदी फाऊंडेशनचे मनजितसिंग विरदी यांनी सांगितले. हा चित्रपट एक मोठ्या स्क्रीनवर दाखविण्यात आला असून या सोबत पॉपकॉर्न, वेफर्स, सँडविच, चॉकलेट्स, पाण्याच्या वॉटल्स आणि गुलाबपुष्प देवुन मनजितसिंग विरदी यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी पोलिस दलातील पीएसआय संजय साबळे, डॉ.प्रकश भासले, डॉ. उदय भुजबळ, स्मृती मोद, राहूल जगतप, मनिष खंडागळे, किरण जोशी, हरालसिंग राजपाल, डॉ.त्रिषा राणे, फारय ब्रिगेडच स्टेशन मास्टर सुनिल नाईक, बुधानी वेफर्सचे मालक अरविंद बुधानी सहित ससून हॉस्पिटलचे कर्मचर , सरदार वल्लभभाई पटेल कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटल, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक ट्रस्टचे अधिकरी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी आयनॉक्स थिएटर तर्फे ट्रॉफी देवून सन्मान करण्यात आला.या शो मध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक ट्रस्टचे कर्मचारी, ससून जनरल हॉस्पिटलचे कर्मचारी, सरदार वल्लभभाई पटेल कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटलचे कर्मचारी, फायर ब्रिगेडचे कर्मचारी, अंतिम संस्कार करणार्‍या कर्मचार्‍याचे परिवार, विविध एनजीओ मध्ये आजारी, वृध्द, लहान मुलांची देखभाल करणारे सेवक, पोलिसदलातील अधिकारी कर्मचार्यांनी सहभाग घेतला होता आणि चित्रपटाचा आनंद लुटला.


मंजीतसिंग विरदी फाउंडेशन ची स्थापना सन 1998 साली झाली यंदा या फाउंडेशनचे रोप्य महोत्सवी वर्ष आहे फाउंडेशनने कॅन्सरग्रस्त एचआयव्ही, मतिमंद, अपंग मूकबधिर दारिद्र्यरेषेखालील मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या बरोबरच त्यांच्या जीवनात कधीही न विसरणारे आनंदाचे क्षण आणण्याचे कार्य निरंतर सुरू ठेवलेले आहे.या मुलांच्या आयुष्यात आनंदाच्या क्षणासाठी दरवर्षी मल्टिप्लेक्स सिनेमागृह आरक्षित करून त्यांच्यासाठी स्पेशल शो चे आयोजन वर्षातून दोनदा केले जाते. हा सिनेमा मुलांनी सुचवलेला असतो या दिवशी त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना खाऊ पिऊ घातले जाते आणि त्यांना त्यांच्या मागणीप्रमाणे गिफ्ट देखील दिले जाते या क्षणाची मुले आतुरतेने वाट पाहतात.तसेच गेली तीन पिढ्यांपासून वारकर्यांची राहण्याची त्यांच्या औषध उपचाराची जबाबदारी विरदी परिवार इमाने इतबारे पार पाडीत आहेत. विरदी परिवाराची दीडशे कुटुंबे पुण्यात आहेत हे फाउंडेशन चालवण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करतात. त्यांच्या सहकार्य आणि त्यांच्या प्रेमामुळेच ही संस्था उभी आहे आणि दिमाखाने कार्य करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *