गणपती मंडळाच्या कार्यकर्त्याप्रती रासने यांची कृतज्ञता.गणपती मंडळाच्या वंदन करणार
कसबा विधानसभा मतदार संघामध्ये भाजप शिवसेना बाळासाहेबांची महायुतीच्या वतीने मला मिळालेली उमेदवारी हा गणपती मंडळाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचा सन्मान आहे असे मी मानतो म्हणून पुढील दोन दिवसात मतदारसंघातील सर्व गणपती मंडळांना भेट देणार असून कार्यकर्त्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करणार असल्याची भावना महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांनी व्यक्त केली.भाजपच्या वतीने रासने यांना उमेदवारी मिळाल्या नंतर ते पत्रकारांशी बोलत होते. रासने यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती आणि ग्रामदैवत कसबा गणपतीचे आरती करून या मोहिमेला आज प्रारंभ केला. पुढील दोन दिवसात ते मतदार संघातील सर्व गणेश मंडळांना भेटी देणार आहेत. रासने यांच्या सामाजिक राजकीय कारकीर्दीची सुरुवात श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंडळाचे कार्यकर्ता म्हणून झाली होती.•गेली ३० वर्षे प्रामाणिकपणे काम केलं त्याचं फळ मला पक्षानी उमेदवारी देऊन दिलं. पक्षाने दिलेल्या संधीचं मी नक्की सोनं करेन. कसबा हा भाजपाचा अनेक वर्षांपासूनचा असलेला गढ आहे.पक्षातील सर्व नेत्यांच्या आशीर्वादाने हि निवडणूक विक्रमी मतांनी जिंकू असा विश्वास आहे. सर्वांना मान्य, सर्व सामान्य, गणेश मंडळाचा कार्यकर्ता, ही आमची टॅगलाईन आहे. नागरिकांचा आशीर्वाद हिच आमची संपत्ती आहे.कोरोनाकाळात पुणे महापालिकेचं उत्पन्न मी वाढवून दाखवलं होतं. पुणे शहरात विविध उपक्रम राबवून शहराचा विकास करण्याचा मी प्रयत्न केला होता. राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्याला प्रमोशन व्हावं हि अपेक्षा असते, नगरसेवक म्हणून काम करत असतांना राज्याच्या विकासात आपला हातभार असावा हि स्वाभाविक इच्छा असते. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रासने यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मोतीबाग कार्यालयाला भेट दिली त्यानंतर मामलेदार कचेरी येथे जाऊन उमाजी नाईक यांना अभिवादन केले रासने यांनी खासदार गिरीश बापट यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले स्वर्गीय आमदार मुक्ताताई टिळक यांच्या कुटुंबीयांची टिळक वाड्यात जाऊन भेट घेतली. मुक्ताताईंच्या प्रतिमेला अभिवादन केले.