23/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

क्षिती जोग साकारणार जीगरवाली बाई

Share Post

बिनधास्त, आत्मविश्वासू, स्पष्टवक्ती अशी वैदेही ‘सनी’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वैदेहीची भूमिका क्षिती जोग साकारणार असून यात तीला जीगरवाली बाई असं म्हणण्यात आलं आहे.

कॅफे मालक असलेली वैदेही सनीसोबत कधी कठोर वागताना दिसत आहे, तर कधी त्याची काळजीही घेताना दिसत आहे. सनी आणि वैदेहीमध्ये कामासोबतच भावनिक नातं निर्माण झाल्याचेही दिसतेय. त्यांच्या नात्यातील नेमकी गंमत ‘सनी’ पाहिल्यावरच उलगडेल. दरम्यान या दोघांमधील केमिस्ट्री पडद्यावर उत्तम दिसत आहे. क्षिती जोग आणि ललित प्रभाकरने नाटक आणि मालिकेमध्ये एकत्र काम केले आहे. ‘सनी’च्या निमित्ताने क्षिती आणि ललित आता चित्रपटातही एकत्र दिसणार आहेत.

यापूर्वी क्षिती जोग आपल्याला ‘झिम्मा’ चित्रपटात दिसली मिता जहांगिरदार ही व्यक्तिरेखा साकारणारी क्षिती यात थोडी गोंधळलेली, घाबरट अशी दिसली. मितावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. आता या भूमिकेच्या अगदी विरूद्ध अशी ‘सनी’मधील तिची भूमिका आहे आणि ही भूमिकाही तिच्या चाहत्यांना नक्कीच आवडेल.

क्रेझी फ्यु फिल्म्स, प्लॅनेट मराठी, क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन प्रस्तुत, चलचित्र कंपनी निर्मित ‘सनी’ हा सिनेमा १८ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित, इरावती कर्णिक लिखित या चित्रपटात ललित प्रभाकर, क्षिती जोग यांच्यासह चिन्मय मांडलेकर यांचीही प्रमुख भूमिका आहे. अक्षय विलास बर्दापूरकर, क्षिती जोग, विराज गवस व उर्फी काझमी हे सिनेमाचे निर्माते असून संतोष खेर, तेजस्विनी पंडित सह-निर्माते आहेत.