कोथरूड येथे ‘व्हायब्रंट अॅकॅडमी’चे उद्घाटन
“शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात आता कोटामधील सर्वोत्कृष्ठ क्लासेस सुरू होत आहे. विद्यार्थी व पालकांसाठी ही आनंदाची बाब आहे. याद्वारे उच्च शिक्षणाची तयारी करण्यासाठी कोटा येथे जाणारे महाराष्ट्रातील विद्यार्थी नीट, जेईई, सीईटी, आयआयटी सारखे अभ्यासक्रम येथे पूर्ण करू शकतील.” असे विचार महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्रात प्रथमच पुण्यात व्हीव्हीबी एज्युकेेशनल अॅकॅडमी तर्फे वनाज कॉर्नर, कोथरूड येथे कोटा, राजस्थान येथील ‘व्हायब्रंट अॅकॅडमी’च्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहळ हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच, व्हीव्हीबी अॅकॅडमीचे संचालक विवेक मुरकुटे, संचालक सौरभ गवई, सल्लागार भगवान गवई आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ञ डॉ. विलास नितनवरे उपस्थित होते.
“ या क्लासेसद्वारे विद्यार्थ्यांना कमी खर्चात उच्च दर्जाचे शिक्षण दिले जाईल. म्हणून तुम्ही स्वतःची इमारत बांधली पाहिजे. यासोबतच शहरांमध्ये अनेक शाखा सुरू कराव्यात. असे ही शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.”
भगवान गवई म्हणाले,“संस्थेतील मुलांना शैक्षणिक व करियर मार्गदर्शन केले जाईल. त्यांची मानसिक तयारी करून लवकर उच्च शिक्षणाचे दरवाजे उघडण्यासाठी संस्था कटिबध्द राहील. यासोबतच समुपदेशन आणि योग्य मार्गदर्शनाच्या आधारे शिक्षणाचा मार्ग दाखवला जाईल.”
विवेक मुरकुटे म्हणाले,“ ८वी, ९वीं आणि १० वींच्या विद्यार्थ्यांसाठी अॅडवॉन्स अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. लायब्ररी, कॉम्प्युटर, लॅब,प्रगत अभ्यास साहित्य, प्रश्नपत्रिका आणि पूर्णवेळ शिक्षक येथे उपलब्ध असतील. अभ्यासिका, शंका दूर करणे, प्रेरणा वर्ग आणि काही शैक्षणिक संस्थांबरोबर करार केले जाणार आहे.”
या प्रसंगी विविध शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.