कोकणवासीय मराठा समाज पुणे व पिंपरीत चिंचवड च्या वतीने दिवाळी निमित्त फराळ वाटप
समाजातील एखाद्या कुटुंबातील सदस्याचे निधन झाल्यास त्या कुटुंबात साधारणपणे एक वर्ष तरी कोणताही सण साजरा केला जात नाही. अश्या वेळेला आपल्या समाजातील लोकांची दिवाळी गोड व्हावी असा मानस संस्थेचे पदाधिकारी व सभासद यांनी व्यक्त केला आणि समाजातील ज्या समाजबांधवांच्या कुटुंबातील व्यक्तीचे निधन झाले आहे, अश्या समाजबांधवांना दिवाळी निमित्ताने फराळाचे वाटप करण्याचे सर्वानुमते मान्य करण्यात आले. त्याप्रमाणे समाजातील एकूण ५३ कुटुंबांना संस्थेच्या वतीने दिवाळीच्या निमित्ताने फराळाचे वाटप करण्यात आले. त्याकरिता संस्थेच्या सर्व पदाधिकारी, विभागीय अध्यक्ष व सभासद यांनी खूप मेहनत घेतली. अगदी मयत सदस्यांची विभागवारप्रमाणे यादी करणे, तसेच फराळ वाटपाची जबाबदारी प्रत्येकांनी घेऊन वाटप पूर्ण केले. समाजबांधवांकडून या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष श्री संतोष कृष्णा मोरे यांनी दिली. सदर उपक्रम यशस्वी करण्यात श्री.विनोद चव्हाण व श्री. संदिप सांवत यांनी विशेष मेहनत घेतली.