23/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

कॉलेज विश्ववावर थेट भाष्य करणाऱ्या 'कॉलेज अ फेयर' या हिंदी वेब सिरीज मुहूर्त सिद्धांत ग्रुप ऑफ इंस्टीट्यूट पुणे या ठिकाणी

‘कॉलेज अ फेअर’ या हिंदी वेब सिरीज मुहूर्त

Share Post

कॉलेज विश्ववावर थेट भाष्य करणाऱ्या ‘कॉलेज अ फेयर’ या हिंदी वेब सिरीज मुहूर्त सिद्धांत ग्रुप ऑफ इंस्टीट्यूट पुणे या ठिकाणी मोठ्या दिमाखात पार पडला. या प्रसंगी प्रोडूसर वाय. एस. यादव व सागर जैन, अभिनेत्री प्राची लिंगरे ज्योती यादव दिग्दर्शक रामकुमार शेडगे व कपिल जोंधले कैमरामैन आर राजकुमार .. प्रोडक्शन व्यवस्थापक समीर निकम आदी मान्यवर उपस्थित होते.

जैन फिल्म प्रोडक्शन निर्मित कॉलेज अ.फेयर ही वेब सिरीज तरुणाईच्या हृदयाचा ठाव घेईल. कॉलेजमध्ये घडणाऱ्या विविध घटना, आनंदाचे क्षण रसिकांना पाहता येतील. तसेच या चित्रपटात हिंदीतील मोठे कलाकार पाहवयास मिळतील. सिद्धांत इंजिनिअरिंग कॉलेज पुणे या ठिकाणी या सिरीजचे बऱ्यापैकी शूटिंग पार पडेल. अभिनेत्री प्राची लिंगरे ही मुख्य नायिकेच्या भूमिकेत आहेत.

या सिरीजचे शूटिंग लवकरच सुरू होणार असून पुणे परिसर व इतर जवळच्या ठिकाणी पार पडेल.