20/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

कुल फॅन्‍सने बीएलडीसी तंत्रज्ञानाने स्‍मार्ट व स्‍टायलिश, एनर्जी-सेव्हिंग फॅन्‍सची केली नवीन श्रेणी लाँच

Share Post

कुल फॅन्‍स (Kuhl Fans) या देशातील सर्वात मोठ्या प्‍युरिफायर्स ब्रॅण्‍डच्‍या अधिपत्‍याखालील कंपनीने पुण्‍यामध्‍ये कुल स्‍मार्ट व स्‍टायलिश फॅन्‍सची नवीन श्रेणी लाँच केली आहे. बीएलडीसी तंत्रज्ञानाचा वापर करत डिझाइन करण्‍यात आलेले हे पंखे आकर्षक व स्टायलिश असण्‍यासह ऊर्जा-कार्यक्षम देखील आहेत, जे वीज वापरामध्‍ये जवळपास ६५ टक्‍के बचत करतात.

आपला पोर्टफोलिओ विस्‍तारित करत कुल आता ऊर्जा-कार्यक्षम फॅन मॉडेल्‍सची विस्‍तारित श्रेणी देते. पुण्‍यातील लाँचमधून नवीन रिटेल पॉइण्‍ट्समध्‍ये नवीन श्रेणी उपलब्‍ध होते, तसेच कुल फॅन्‍स व्‍यापक प्रमाणात उपलब्‍ध असण्‍याची खात्री मिळते. या धोरणात्‍मक विस्‍तारीकरणासह कुलचा बाजारपेठेतील ऊर्जा-कार्यक्षम व नाविन्‍यपूर्ण सिलिंग फॅन सोलयूशन्‍सची प्रमुख प्रदाता म्‍हणून स्‍थान अधिक दृढ करण्‍याचा मनसुबा आहे.

कुलने बीएलडीसी तंत्रज्ञानावर आधारित नाविन्‍यपूर्ण नेक्‍स्‍ट-जेन डिसर्ट कूलर फॅन ‘कुल एक्‍सझेल’ लाँच केला. हा फ्लोअर-स्‍टॅण्डिंग डिसर्ट कूलर कम फॅन अल्‍ट्रासोनिक वॉटर मिस्‍टच्‍या माध्‍यमातून हवेमध्‍ये थंडावा पसरवतो, ज्‍यामुळे रूममधील तापमान जवळपास ५ अंश सेल्सिअसने कमी होते. तसेच, एक्‍सझेल डिसर्ट कूलर फॅन कोणताही आवाज न करता कार्यरत राहाते, ज्‍यामुळे रात्रीच्‍या वेळी शांतमय झोपेची खात्री मिळते. या पंख्‍यामधील ऑस्किलेशन वैशिष्‍ट्य आणि १२ तासांपर्यंत टिकणाऱ्या इंटर्नल वॉटर टँकसह हा पंखा तुमच्‍या घरामधील आवाज करणाऱ्या व पारंपारिक डिसर्ट कूलर्सच्‍या जागी योग्‍य रिप्‍लेसमेंट आहे. या पंख्‍याची सुरूवातीची किंमत ८९९० रूपये आहे.