किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर दिपाताई राजमाने यांना फ्रान्स युनिव्हर्सिटी मार्फत “डॉक्टर ऑफ सोशल वर्क ”पदवी प्रदान
पुण्यात लोकप्रिय असणा-या दीपाताई राजमाने या कौटुंबिक संघर्ष सोशित, समाजातला संघर्ष ही त्यांनी सोसला, जिद्द, विश्वास व चिकाटीच्या जोरावर त्यांनि आपले परखड विचार मांडले.
दिपाताई राजमाने यांना अनेक सामाजिक व राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. आता नुकत्याच पार पडलेल्या परभणी येथील कार्यक्रमात जनहित फाउंडेशन तर्फे त्यांना महाराष्ट्र समता गौरव पुरस्कार सन्मानाने गौरवण्यात आले.
दीपा राजमाने यांच्या कार्याची दखल इंटरनॅशनल युनिस एज्युकेशन कौन्सिल ऑफ फ्रान्स युनिव्हर्सिटीने घेतली व “डॉक्टर ऑफ सोशल वर्क ”ही मानद डॉक्टरेट पदवी “तामिळनाडू येथे कौन्सिल चेअरपर्सन डॉ.एम.प्रभू,विद्यापीठ प्रतिनिधी डॉ मिस् अनास्थेसिया, महाराष्ट्र स्टेट डायरेक्टर,हिरकणी न्यूज,मुकनायक पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष डॉ गणेश वाईकर, संचालिका तथा संपादक भांडाफोड न्यूज डॉ.मिनाक्षी वाईकर, तामिळनाडूच्या कलेक्टर कविता चेरमणी तसेच कॅप्टन कुरी यांच्या शुभहस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
त्यांच्या या”डॉक्टरेट ”सन्मानामुळे बहुजन समाजात चैतन्य निर्माण झाले असून सर्व समाज स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
