23/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

काय ते कॉलेज,काय ती मुलं, काय ते पोस्टर सगळं कसं ‘एकदम कडक’

Share Post

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट बनविले जातात. त्यातील काही चित्रपट समाजातील अवगुणांवर भाष्य करणारे होते. दरम्यान या चित्रपटामधील आकर्षक सीनने प्रेक्षकांचं लक्ष विशेष वेधून घेतलं होतं. या आकर्षक चित्रपटांच्या यादीत आणखी एका चित्रपटाची एंट्री झाली आहे, या धाटणीच्या अंतर्गत येणारा आणि तरुणाईला पसंतीस पडणाऱ्या एका नव्याकोऱ्या आकर्षक, रोमॅंटिक, संघर्षमय, आशयघन अशा ‘एकदम कडक’ चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. ‘ओम साई सिनेफिल्म प्रॉडक्शन’ प्रस्तुत ‘एकदम कडक’ या चित्रपटात अभिनेता पार्थ भालेराव, चिन्मय संत तसेच सैराट फेम तानाजी गलगुंडे व अरबाज हा तरुण कलाकारांचा ग्रुप नव्याने मोठ्या पडद्यावर धुडगूस घालायला सज्ज झाला आहे. पोस्टर पाहता हे कॉलेजचे विद्यार्थी त्यांची कॉलेज लाईफ जगण्याचा मनमुराद आनंद घेतायत हे कळतेय, तर ही मुलं पाहत असणारी मुलगी नक्की कोण आहे, हे मात्र अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.

‘एकदम कडक’ चित्रपटाचे पोस्टर पाहता चित्रपटाची उत्सुकता नक्कीच लागून राहिली असेल यांत शंकाच नाही, शिवाय पोस्टरवरील ती मुलगी कोण आहे याकडेही साऱ्यांच्या नजरा वळल्या आहेत, प्रेक्षकांमधील ही उत्सुकता अधिक ताणली न जाण्यासाठी येत्या २ डिसेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे.