कामाचे उर्वरीत पैसे मागितले म्हणुन बूटीक चालक महिलेस मारहाण, शिवीगाळ व ठार मारण्याची धमकी
पुण्यातील एम. जी. रोडवरील रहेजा मिडास कॉम्प्लेक्स, शॉप नं. 9 मध्ये बूटीक चालवणार्या अफ्रीन अली अहमद खान ( वय 34 वर्षे) यांना पुण्यातील ब्युटी पेजंट कंपनीच्या अंजना मास्करेनस ( एमडी, दिवा पेजेंटस ) यांनी मारहाण व शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली आहे, याबबत अफ्रीन यांनी लष्कर पोलीस ठाण्यात आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. अफ्रीन यांनी अंजनाकडे कामाचे उर्वरित पैसे मागितले म्हणुन नामांकित फॅशन इव्हेंट व्यवसायी अंजना मास्करेनस यांनी अश्लील शिवीगाळी करत जीवे मारण्याची धमकी दिली. या मारहानीमुळे आफ्रीन यांच्या गालावर व नाकावर दुखापत झाली आहे. अंजना यांनी हाताने डाव्या गालावर व नाकावर मारहान करून दुखापत केली व दुकानाला टाळे लावेन तसेच तुला कामच करून देणार नाही अशी धमकीही दिली .या घटनेविषयी माहिती देण्यासाठी आज पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना अफ्रीन म्हण्याल्या की, अंजना ही माझी रेग्यूलर कस्टमर होती, एक वर्षापुर्वी व्यवसायीक अनुषंगाने माझी तिच्याशी ओळख झाली. तिचा फॅशन शो , इव्हेंटचा व्यवसाय आहे. त्या व्यवसायाचे अनुषंगाने तीने माझ्याकडे ५७ गाऊन्सची ऑर्डर दिली होती. त्याचे बील ५७०००/- रु. होते. पैकी ५०००/- रू. तिने अॅडव्हान्स दिले होते. बाकीचे पैसे मागण्याकरिता मी तीच्या आसिस्टन्सला कॉल केला असता तीने परत फोन करू नका अंजना मॅडम स्वतः तुमच्या दुकानावर येवून पैसे देतील असे सांगितले. यानंतर अंजनाने अचानक दुकानात आत येऊन मोठमोठ्याने आरडा-ओरडा करत माझ्याकडे गाऊनचे पैसे मागायचे नाहीत. तु तर सर्व गाऊन खराब केले आहेत. असे म्हणत घाणेरड्या भाषेत शिवीगाळी केली. हा सर्व प्रकार माझ्या दुकानात व दुकाना बाहेरील सार्वजनिक पॅसेजमध्ये घडलेला आहे. त्यामुळे आजुबाजुचे दुकानदार पाहत होते त्यांनीही तिला प्रतिकार केला पण ती करतच होती. त्यानंतर मी ११२ वर कॉल केला असता अंजना तिथून पळून निघून गेली. म्हणून मी पोलीस स्टेशनला येवून अंजना कार्ल मास्केरनस विरूद्ध कायदेशीर कारवाई बाबत तक्रार दिली आहे.

