कागदी पिशवी दिवस साजरा
डीईएस पूर्व प्राथमिक मुरलीधर लोहिया मातृमंदिर शाळा आणि एनईएमएस शाळेत कागदी पिशवी दिवस साजरा करण्यात आला.
प्लास्टिक कसे घातक असते ते मुलांना समजावून सांगितले. पाठोपाठ शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ मुले प्लास्टिक वापरु नका असे फलक घेऊन घोषणा दिल्या. मुलांनी पालकांच्या मदतीने कागदापासून वेगवेगळ्या वस्तु तयार करून शाळेत आणुन त्या आकर्षक पद्धतीने मांडण्यात आल्या.
https://www.smartpunekarnews.com/?p=2299
शाळेमध्ये शिक्षिकांनी मुलांकडून कागदापासून पिशव्या तयार करून घेतल्या होत्या. मुलांकडून प्लास्टिक न वापरण्याची शपथ घेतली. दुकानदारांना कागदी पिशव्या वाटण्यात आल्या. मुख्याध्यापिका माधुरी बर्वे आणि मुख्याध्यापिका शिल्पा कुलकर्णी यांनी संयोजन केले.