NEWS

कस्तुरी स्पा थेरपी आता पुणे शहरात

Share Post

हाऊस ऑफ सलोन ॲपल अंतर्गत ‘कस्तुरी डेस्टिनेशन स्पा प्रायव्हेट लिमिटेड’च्या वतीने पुणे शहरात कोरेगाव पार्क येथे पहिल्यांदाच कस्तुरी स्पा थेरपी आता पुणे शहरात ‘कस्तूरी स्पा थेरपी’ सेंटर सुरू करण्यात आले आहे. || स्वास्थ्यस्य स्वास्थ्य रक्षणम्॥ या श्लोका प्रमाणे आपण आपल्या शरीराची काळजी घेतली तर आरोग्याचे आपोआप रक्षण होते. अन् याच तत्वावर आधारीत ‘कस्तूरी स्पा थेरपी’ सेंटर असून येथे प्राचीन वेद, ग्रंथ, पुराण आणि उपनिषदांमधून प्रेरणा घेऊन आपल्या शरीरातील सात चक्रांना सुसंवाद साधण्यासाठी मदत केली जाते. या ठिकाणी अत्यंत कुशल थेरपिस्ट असून त्यांच्या उपचारांचा उपयोग शारीरीक स्वास्थ्य मिळवून देण्यासाठी केला जातो. 

या ‘कस्तूरी स्पा थेरपी‘ सेंटर विषयी अधिक माहिती देताना सलोन ॲपल, ‘कस्तुरी डेस्टिनेशन स्पा प्रायव्हेट लिमिटेड’च्या संस्थापक संचालक नयना चोपडे म्हणाल्या, कोरेगाव पार्क येथील कस्तुरी ही आमची फ्रांचायसी असून त्याची मालकी श्रृती शाह, स्नेहल शाह आणि पूनम गायकवाड यांची आहे.

पुढे बोलताना नयना चोपडे म्हणाल्या, प्राचीन वेद, ग्रंथ, पुराण आणि उपनिषदांमधून प्रेरणा घेऊन आम्ही कस्तूरी स्पा थेरपी ही एक वेगळी स्पा थेरपी सुरू केली आहे. आगामी काळात धकाधकीच्या जीवनशैलीत शारीक स्वास्थ्य मिळवून देण्यासाठी, तणाव दूर करून शरीराला विश्रांती मिळविण्यासाठी ही थेरपी उपयुक्त ठरणार आहे.