कसब्यात भाजपला धक्का? रविंद्र धंगेकर विजयी होणार… चिंचवड भाजप राखणार; व्हायरल होतोय एक्झिट पोल
पुणे जिल्ह्यातील कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसंबंधी दोन एक्झिट पोल व्हायरल होत आहेत. त्यामध्ये कसब्यामध्ये भाजपला धक्का बसणार असून काँग्रेसचे रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) विजयी होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. तर चिंचवडची जागा मात्र भाजप राखणार असून अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) या विजयी होतील असं म्हटलं आहे. स्ट्रेलिमा (The Strelema, Pune) या संस्थेने जाहीर केलेल्या एक्झिट पोलमध्ये कसब्यात भाजपला धक्का मिळणार आहे. या ठिकाणी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव होणार असून काँग्रेसचे रविंद्र धनगेकर हे 15,077 मताधिक्यांनी विजयी होतील असं सांगितलं आहे. तर चिंचवडची जागा भाजप राखणार असून त्या ठिकाणी अश्विनी जगताप या 32,351 मतांनी विजयी होतील. चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांना 93,003 मतं तर अपक्ष उमेदवार 60,173 मतं मिळणार असल्याचं सांगितलं आहे. स्ट्रेलिमा या संस्थेचा एक्झिट पोल काय सांगतोय?कसबा पेठहेमंत रासने – 59,351रविंद्र धंगेकर – 74,428 चिंचवडराहुल कलाटे – 60,173नाना काटे – 93,003अश्विनी जगतात- 1,25,354भाजपच “चिंचवड”राखण्याची शक्यता , “रिंगसाईड रिसर्च “चा अंदाज..चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत “रिंगसाईड रिसर्च “चा एक्झिट पोल समोर आला आहे . या पोलनुसार ही जागा भाजपच जिंकेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे लागलेली चिंचवड विधानसभेची पोटनिवडणुक अनेक कारणांनी गाजली. भाजपच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप , महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे आणि अपक्ष राहुल तानाजी कलाटे यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळाली. तीनही उमेदवारांनी आपल्या विजयाचा दावा केला आहे. या निकालाविषयी ‘रिंगसाईड रिसर्च’चा एक्झिट पोल समोर आला आहे. या पोलनुसार ही जागा भाजपच जिंकेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.”रिंगसाईड रिसर्च ” : एक्झिट पोल (Ringside Reasearch )रिंगसाईड रिसर्च या संस्थेने केलेल्या मतदानोत्तर सर्वेक्षणातून चिंचवड विधानसभेची जागा भाजप जिंकेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे..एकूण मतदान : 5,68,954झालेले मतदान : 2,87,145 (50.47 टक्के)रिंगसाईड रिसर्च च्या सर्वेक्षणानुसार उमेदवाररनिहाय झालेल्या मतदानाच्या टक्केवारीची विभागणी :अश्विनी लक्ष्मण जगताप (BJP) : 45% – 47 टक्केनाना काटे (NCP) : 31 टक्के – 33 टक्केराहुल कलाटे (IND) : 18 टक्के – 20 टक्केइतर : 2 टक्के – 4 टक्केएकूण – 100 टक्केभाजपचे विजयी मताधिक्य : 12 टक्के – 16 टक्के( टीप सदर बातमी “रिंगसाईड रिसर्च”या जनमत चाचणी करणाऱ्या संस्थेच्या अंदाजावर आधारीत आहे. )