कवी ना.धो.महानोर यांना ‘जीवनगाणे’ कार्यक्रमातून स्वरांजली रविवारी (दि.१७)
गोल्डन मेमरीज प्रस्तुत आणि कलांगण चारिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने निसर्ग कवी ना.धो. महानोर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना ‘जीवनगाणे’ या सांगीतिक कार्यक्रमातून स्वरांजली वाहण्यात येणार आहे. रविवार दिनांक १७ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे.
कार्यक्रमाची संकल्पना, निर्मिती आणि सादरीकरण चैत्राली अभ्यंकर यांचे आहे. तसेच राहुल जोशी, मीनल पोंक्षे, हेमंत वाळुंजकर हे गायन साथ करणार आहेत. डॉ. नरेंद्र चिपळूणकर, तुषार दीक्षित, ओंकार पाटणकर, डॉ.राजेंद्र दूरकर, राजू जावळकर, केदार मोरे, प्रतीक गुजर हे साथसंगत करणार आहेत. मिलिंद कुलकर्णी हे निवेदन करणार आहेत.
निसर्ग कविता, रानातल्या कविता, जैत रे जैत, एक होता विदूषक, अजिंठा यातील गीतांच्या सादरीकरणातून ना. धो. महानोर यांचा जीवन प्रवास उलगडण्यात येणार आहे. कार्यक्रम विनामूल्य खुला असून रसिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन चैत्राली अभ्यंकर यांनी केले आहे.