Entertainment

कलाकारांची दमदार फळी असणारा ‘फकाट’ १९ मे रोजी होणार प्रदर्शित

Share Post

प्रत्येकाच्या आयुष्यात एखादी तरी हायली कॉन्फिडेन्शियल गोष्ट असतेच, हीच गोष्ट दुसऱ्या कोणाच्या हाती लागली तर काय जबरदस्त धिंगाणा होऊ शकतो याची कल्पनाच करता येत नाही. याच भन्नाट विषयावर आधारित एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘फकाट’ असे हटके नाव असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शक श्रेयश जाधव असून नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आले असून येत्या १९ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या पोस्टरमध्ये हेमंत ढोमे, सुयोग गोऱ्हे, अविनाश नारकर, कबीर दुहान सिंग, अनुजा साठे, रसिका सुनील, नितीश चव्हाण, किरण गायकवाड आणि महेश जाधव दिसत आहेत. दमदार कलाकारांची फळी असलेला हा एक अ‍ॅक्शन कॉमेडी चित्रपट आहे.

पोस्टरमध्ये चित्रपटातील सगळे कलाकार दिसत असून एलओसी सिक्रेटची फाईल दिसत आहे आणि आजूबाजूला पैसेही दिसत आहेत. त्यामुळे आता हा नेमका काय प्रकार आहे? काय रहस्य आहे, याचे उत्तर चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच मिळेल.

दिग्दर्शक श्रेयश जाधव म्हणतात, “प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारा हा एक धमाल कौटुंबिक चित्रपट आहे. यात कॉमेडी आहे, अ‍ॅक्शन आहे. यात हायली कॉन्फिडेन्शियल धिंगाणा आहे. चित्रपटातील सगळेच कलाकार भन्नाट आहेत. प्रत्येकाने आपल्याला व्यक्तिरेखेला शंभर टक्के न्याय दिला आहे.”

वक्रतुंड एन्टरटेनमेंट्स, गणराज स्टुडिओ प्रस्तुत, निता जाधव निर्मित हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *