कर्म,ज्ञान व भक्तियोगाने मानव सुखी होतो -डॉ.निशिकांत श्रोत्री
“मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, या उक्ती नुसार प्रत्येक मनुष्य हा सुखी राहू शकतो. त्यासाठी कर्म, ज्ञान आणि भक्ती योग हा अत्यंत महत्वाचा आहे. कर्मयोगात सेवा महत्वाची असून अहंकाराला तिलांजली दयावी. तरच मानव हा शारीरिक, मानसिक व अध्यात्मिक स्तरावर सुखी राहतो.” असे विचार ज्येष्ठ साहित्यीक डॉ. निशिकांत श्रोत्री यांनी व्यक्त केले. तितिक्षा इंटरनॅशनल आणि प्रोलक्स प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवारी पुण्यातील जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे आयोजित पहिली आंतरराष्ट्रीय आरोग्य आणि सांस्कृतिक परिषद २०२४ संपन्न झाली. यावेळी लेखिका डॉ. प्रचिती पुंडे लिखित ‘वेलनेस रीडिफाइंड’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.या प्रसंगी डॉ. आशितोष मिसाळ हे मुख्य अतिथि म्हणून उपस्थित होते. तसेच जापान येथील डॉ.कोटा नागुची, लेखिका डॉ. प्रचिती पुंडे आणि तितिक्षा इंटरनॅशनल फाउंडेशनच्या प्रिया दामले यांची प्रमुख उपस्थिती होती. साहित्य क्षेत्रात आयुष्यभर अमुल्य योगदान दिल्याबद्दल मधुसुदन घाणेकर, समाजिक, साहित्यीक, काव्य, नाट्य, सेवा व एनजीओ क्षेत्रातील कार्यकरणार्या व्यक्तींचा आणि आर.के मिडियाचे संचालक रामहरी कराड यांना शाल व सन्मानपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला.डॉ. निशिकांत श्रोत्री म्हणाले,”डब्ल्यूएचओ ने शारीरिक, मानसिक, सामाजिक व आध्यात्मिक आरोग्यवर विस्तृत विवेचन केले आहे. आध्यात्मिक आरोग्य महत्वाचे असून अधि आत्मा म्हणजे, ब्रह्मतत्व त्यांनंतर कॉस्मिक एनर्जी कशी असते याचा उलगडा केला. त्याचप्रमाणे धन्वतरी, शुश्रृत, चरक आणि शारंधर हे वैद्यकीय शास्त्रताील सर्व प्रथम आहेत. हे पुस्तक आरोग्याच्या क्षेत्रातील सर्वोत्तम असून सर्वांसाठी लाभदायक राहिल.”डॉ. प्रचिति पुंडे म्हणाल्या,” ‘ग्लॅमर’ आणि ‘निरोगीपणाच्या’ अभूतपूर्व मिश्रणातून संपूर्ण जगाला ग्लॅमवेलची नवी ओळख या पुस्तकातून होईल. ग्लॅमोवेल तत्वज्ञान “२:२ ह्यूमन कोकोरो संकल्पनेवर आधारित आहे. वेलनेस, वेलबिइंग आणि ऑप्टिमल या तत्वांवर मानवाच्या आरोग्यात मोठे बदल घडू शकतात. वर्तमान काळात सेल्फ आयसोलेटेट ह्यमून बिइंग आहे. अशावेळेसे ग्लॅमवेल महत्वाचे ठरेल. ”डॉ. सतिश मिसाळ म्हणाले,” भगवद्गीता आणि वेलनेस यांचा खूप जवळचा संबंध आहे. ५५०० केसस हाताळतांना आलेल्या अनुभवातून डॉ. पुंडे यांनी वेलनेसची संकल्पना अस्तित्वात आणली. आज कार्पोरेट क्षेत्रात सर्वात जास्त शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक आरोग्यावर भर दिला जातोे. तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक व्यक्ती दुखी असतांना हे पुस्तक सुखाचे दरवाजे उघडेल.”कोटा नागुची म्हणाले,” द्वितिय महायुध्दानंतर जपान मध्ये हॅपी सायन्स उदयास आले. यानंतर असे लक्षात आले की ७० ते ८० टक्केलोक हे फक्त मानसिक व बौद्धिक तनावामुळेच अधिक आजारी पडतात. त्यासाठी सर्वांवर प्रेम करा, आदर करा आणि सकारात्मक विचारधारेवर चला.”प्रिया दामले म्हणाल्या,”हसत खेळत आरोग्य सांभाळणे म्हणजे सहज आरोग्य होय. सुखी जीवन जगण्यासाठी कोणत्या गोष्टींचा स्विकार करावा किंवा करू नये हे डॉ.पुंडे यांनी आपल्या पुस्तकात मांडले आहे.”यावेळी रमेश पाचंगे यांनी चौघड्याचे सुंदर वादन केले. अजित जाधव यांनी गाणे गायले. साक्षी यांनी प्रोलक्स अॅण्ड ग्लोमोवेल संदर्भातील माहिती देऊन आधुनिक काळात याची गरज किती महत्वाची आहे हे सांगितले.सूत्रसंचालन व आभार मोनिका मोजकर यांनी केले.