29/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या उपस्थितीत 'बंटारा भवन' चा चौथा वर्धापनदिन साजरा 

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या उपस्थितीत ‘बंटारा भवन’ चा चौथा वर्धापनदिन साजरा 

Share Post

पुणे :  बंटा संघ, पुणेच्या वतीने उभारण्यात आलेल्या ‘बंटारा भवन’ चा चौथा वर्धापनदिन कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात शनिवारी साजरा करण्यात आला. या प्रसंगी बंटा संघच्या वतीने ‘कल्पवृक्ष’ या उपक्रमा अंतर्गत  ‘विद्यादाता’, ‘अन्नदाता’, ‘आरोग्यदाता’, ‘क्रीडादाता’, ‘आश्रयदाता’ या पाच विभागात विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, शिष्यवृत्ती, आरोग्य किट वाटप, मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारन्यात आले आणि मान्यवरांचा ‘सेवा साधक प्रशस्ती’ पुरस्काने सन्मान बसवराज बोम्मई यांच्या हस्ते करण्यात आला.

या सोहळ्याला भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी, कर्नाटकचे सांस्कृतिक मंत्री व्ही. सुनिलकुमार, कर्नाटक कोस्टल डेव्हलपमेंट  अथोरिटी  चे  मट्टर रत्नाकर हे गडे, एम आरजी ग्रुपचे अध्यक्ष के प्रकाश शेट्टी, फेडरेशन ऑफ वर्ल्ड बंटा असोसियशन चे अध्यक्ष आयकला हरिष शेट्टी, मतृभूमी को ऑपरेटीव्ह सोसायटीचे प्रवीण भोजा शेट्टी, इंटरनॅशनल बंट वेलफेअर ट्रस्ट मंगळूरूचे अध्यक्ष गूर्मे  सुरेश शेट्टी आदी उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले, पुण्यातील बंटारा समाजातील लोकांना सांगायची गरज नाही, ते जिथे जातात तिथे आपले स्थान निर्माण करतात, सर्वांना सोबत घेऊन ते काम करतात आणि लोकांना प्रेमाने आपलेसे करतात. स्थानिक सांस्कृतिक परंपरेशी ते स्वतःला जोडून घेतात हे समाजाचे वैशिष्ट्ये आहे. तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाला पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी लाभले हे आपले भाग्य आहे आणि हर घर तिरंगा अभियानातून देश प्रथम ही भावांना निर्माण होते असेही त्यांनी नमूद केले. 

‘बंटार भवन’च्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित या सोहळ्यात  बंटा संघ पुणेचे संस्थापक जगन्नाथ शेट्टी व गुंडूराज शेट्टी यांच्या पुतळ्याचे अनावरण कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच सदाशिव शेट्टी (हेरंबा इंडस्ट्रीज,  चेअरमन), पुष्पा हेगडे (आय सी डबल्यू, व्हाईस प्रेसिडेंट), शशीधर शेट्टी (शशी केटरींग सर्विसेस, सी एम डी), चिराग शेट्टी (आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू), अशोक पक्काला (मुख्य संपादक बंटरवाणी) यांना ‘सेवा साधक प्रशस्ती’ पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाविषयी माहिती देताना बंटा संघ पुणे चे अध्यक्ष संतोष शेट्टी म्हणाले, बंटा संघाच्या वतीने बाणेर येथील एक एकरच्या जागेत 2018 मध्ये बंटारा भवन उभारण्यात आले. याचे उद्घाटन अभिनेत्री ऐश्वर्या राय – बच्चन, विरेन्द्र हेगडे आदींच्या उपस्थितीत झाले. या मार्फत सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा या क्षेत्रात मदत करण्यात येते. कोरोनाच्या काळात या भावनच्या माध्यमातून गरजूंना 25 लाखांची मदत करण्यात आली आहे. दरम्यान, सुमारे एक एकर परिसर असलेल्या बंटारा भवनमध्ये बाराशे लोकांची आसनव्यावस्था असलेले एक ऑडिटोरियम साकारण्यात आले आहे. यामध्ये एक चावडी, तीन प्रशस्त पार्टी हॉल, 8 खोल्या आदींचा समावेश आहे.

दरम्यान याप्रसंगी बंटा संघ, पुणेच्या वतीने कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे भव्य स्वागत करण्यात आले.  तसेच बंटा संघ, पुणेचे अध्यक्ष संतोष व्ही. शेट्टी यांनी ‘बंटारा भवन’ ची उभारणी, बंटा संघाच्या वाटचालीत दिलेल्या बहुमोल योगदानाबद्दल नागरिकांच्या वतीने ‘बंटा सेनाधीपाती’ हा विशेष पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.