18/07/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

ऑल इंडिया मुशायरा ; रसिकांचा मोठा प्रतिसाद !!

ऑल इंडिया मुशायरा ; रसिकांचा मोठा प्रतिसाद !!

Share Post

34 व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये दि २ सप्टे रोजी रात्री ९ वाजता . श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे ‘ऑल इंडिया
मुशायरा सादर झाला .
यामध्ये डॉ. पॉपुलर मेरठी (मेरठ), जौहर कानपुरी(कानपूर), डॉ. नुसरत मेहदी(भोपाळ), शकील आझमी
(मुंबई), हसन काझमी (लखनौ),कुंवर जावेद (राजस्थान), टिपिकल जगतीयाली (तेलंगणा), सुरिंदरसिंग शजर
(दिल्ली), वारीस वारसी (उत्तर प्रदेश), विभा शुक्ला (बनारस), अश्फाक नीझामी मरुली (जळगाव) ,असलम
चिस्ती (पुणे),जिया बागपती (पिंपरी) हे राष्ट्रीय शायर सहभागी झाले होते .याचे सूत्रसंचालन डॉ. महताब
आलम(भोपाळ) यांनी केले.

भारतीय लष्कराचे माजी उप सेनाप्रमुख आणि अलीगड मुस्लीम विद्यापीठाचे माजी कुलगुरू लेफ्ट. जन.
ज़मीरउद्दीन शाह (निवृत्त) हे सपत्नीक प्रमुखपाहुणे म्हणून उपस्थित होते.महाराष्ट्र कॉस्मो पौलिटीयन एज्युकेशन
सोसायटीचे अध्यक्ष पी. ए. इनामदार व उपाध्यक्षा आबेदा इनामदार यांनी याचे संयोजन केले होते.
प्रारंभी शमारोषन (मेणबत्ती प्रज्वलन) करून मुशायरास सुरुवात झाली.राष्ट्रभक्ती ,सामाजिक एकता व समता
यांचे संदेश विविध शायरांनी वैविध्यपूर्णरित्या आपल्या शायरीतून दिले.त्यास प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला.
या प्रसंगी लेफ्ट. जन. ज़मीरउद्दीन शाह म्हणाले की ,भाषा ही कोणत्या एका धर्माची नसते तर ती स्थानिक
असते आणि उर्दू सारखी भाषा शायारीमुळे अधिक समृद्ध झाली आणि टिकूनही राहिली . आपल्या देशात
सैन्यदलात फाळणीनंतर दीर्घकाळ अन्य भाषांच्याप्रमाणेच उर्दू भाषेचाही उपयोग होत होता. असे सांगून
दरवर्षी ‘ऑल इंडिया मुशायरा’ आयोजित करण्याबद्दल पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी ,संयोजक
पी.ए. इनामदार आणि अबेदा इनामदार यांना त्यांनी धन्यवाद दिले .याप्रसंगी पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश
कलमाडी यांनी सर्व शायरांना शुभेच्छा दिल्या. या वेळी पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल
,मुख्यसंयोजक डॉ सतीश देसाई ,कॉंग्रेस नेते अॅड अभय छाजेड,अॅड आयुब शेख ,काका धर्मावत आदि.
उपस्थितीत होते.

दर्द की हदसे गुजारे तो सभी जायेंगे
चाहे जीतनीभी बुलंदीयोपे चला जाये कोई
अस्मानों से पुकारे तो सभी जायेंगे
नादिया लाशोन्को पानी मै नही रखती
तैरे या डूबे किनारे तो सभी जायेंगे

  • शकील आझमी ,मुंबई
    चमन मै सब के लिये एहतेमाम थोडी है ,
    जो होना चाहिये वैसा निजाम थोडी है
    वो झूट बोल रहा है तो बोलने दो उसे

दुकानदार है कोई इमाम थोडी है
जौहर कानपुरी,कानपूर
अशा अनेक शायरींना रसिकांनी वन्समोर देत टाळ्यांचा कडकडाट केला.पहाटे ३.३० पर्यंत कवींची शायरी
रंगत गेली होती.सर्व पुणेकरांनी यास अलोट गर्दी केली होती.

या प्रसंगी डावीकडून महाराष्ट्र कॉस्मो पौलिटीयन एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी इरफान सर,
पुणे फेस्टिव्हल चे अध्यक्ष सुरेश कलमाडी ,मुस्लीम बँकचे संचालक बबलू सैयद, महाराष्ट्र कॉस्मो पौलिटीयन
एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व संयोजक पी ए इनामदार , लेफ्ट. जन. ज़मीरउद्दीन शाह ,(निवृत्त) ,मिसेस
सौ.शाह , महाराष्ट्र कॉस्मो पौलिटीयन एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षा अबेदा इनामदार,व इकबाल
अन्सारी .