एस.पी. कॉलेजच्या सर्वोत्कृष्ट एन.सी.सी.च्या तीन कॅडेटला यंदाच्या “मेजर हेमंत मांजरेकर ट्रॉफी”व रोख बक्षिसे प्रदान
अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद महाराष्ट्र आणि गोवाच्या वतीने एस.पी. महाविद्यालयातील एन.सी.सी. विभागाच्या तीन कॅडेट्सला ह्या वर्षीचा”मेजर मांजरेकर फिरता चषक” व रोख बक्षिसे प्रदान करण्यात आली. या समारंभामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून १९७१ च्या युद्धात सहभागी झालेले एयर मार्शल भूषण गोखले आणि नौदल निवृत्त अधिकारी विनायक अभ्यंकर होते.कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रमुख पाहुण्यांनी भारत मातेचे पूजन केले. मेजर हेमंत मांजरेकर ह्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात करून आदरांजली वाहण्यात आली.नंतर अखिल भारतीय पूर्व सेवा सैनिक परिषद यांच्यातर्फे व्यासपीठावरील प्रमुख पाहुण्यांचा स्वागत व सत्कार करण्यात आला.एअर मार्शल प्रदीप बापट ( निवृत्त ) ह्यांचे अध्यक्षीय समारोपाचे भाषण झाले.कार्यक्रमास एअर मार्शल भूषण गोखले आणि निवृत्त नौदल अधिकारी विनायक अभ्यंकर हे प्रमुख पाहुणे होते. ह्यांनी त्यांच्या १९७१ च्या युद्धाच्या आठवणी सांगितल्या.एस. पी. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील गायकवाड़ ह्यांनी छात्र सैनिकांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे आयोजन एन. सी. सी. ऑफिसर लेफ्टनंट गोविंद धुळगंडे, लेफ्टनंट दीपाली बुटाला,लेफ्टनंट बाळासाहेब भौराले,ह्यांनी एअर व्हॉईस मार्शल नितीन वैद्य (निवृत्त) ह्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
मेजर हेमंत मांजरेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पहिले सर्वोत्कृष्ट एन.सी.सी. कॅडेट चे पारितोषिक व फिरता चषक व रोख रक्कम रुपये २ हजार,कॅडेट ज्युनिअर अंडर ऑफिसर तेज दीक्षित ह्यास,त्याच प्रमाणे द्वितीय स्थान पी.ओ. ओंकार मुळे ह्यास फिरता चषक व रोख रक्कम रुपये दीड हजार आणि तृतीय स्थान ज्युनिअर अंडर ऑफिसर रितेश राठोड ह्यास फिरता चषक व रोख रक्कम रुपये दीड हजार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले
कॅडेट श्रिया जगताप हिने सूत्र संचलन केले.तर आभार कॅडेट अदिती जोशी हिने मानले.