26/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

एस. पी. इंटरनॅशनल कॉलेज मध्ये विज्ञानवादी नागपंचमी साजरी

Share Post

अमर एज्युकेशन सोसायटीचे आंबेगाव पठार, पुणे स्थित “एस. पी. इंटरनॅशनल स्कूल आणि कॉलेज” मध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनातून नागपंचमी मान्यवरांच्या उपस्थितीत साजरी झाली. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शिक्षकांनी विविध सर्प व नागाच्या प्रकारांबद्दल माहिती दिली. आपण सापाला घाबरतो परंतु त्यांचे निसर्ग चक्रात योगदान अनमोल आहे.
प्रत्येक साप हा काही विषारी नसतो, त्यामुळे एखाद्याला जर साप दिसला तर घाबरून न जाता सर्पमित्राला बोलवावे, असे मुख्याध्यापिका पल्लवी सोकंडे म्हणाल्या. तसेच भारतीय संस्कृती जपण्यासाठी प्रत्येकाने घरोघरी विज्ञानवादी नागपंचमी साजरी करावी, असे आवाहन संस्थेच्या सचिव मंगलताई सोकांडे यांनी केले. विद्यार्थ्यांनी नागाच्या प्रतिकृती बनवल्या व प्रबोधनात्मक गीते सादर केली.