एस. डी. फिल्म्स प्रॉडक्शन हाऊसचे मान्यवरांच्या उपस्थितीत लॉंचिंग
अनेक सुमधूर आणि उत्तमोत्तम गाण्यांची मेजवानी प्रेक्षकांना दिल्यानंत आता एस. डी. फिल्म्स सिनेमा, वेब सिरिज आणि शॉर्ट फिल्म निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवत आहे. आज अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर एस. डी. फिल्म प्रॉडक्शन हाऊस लॉंच करण्यात आले. तसेच ‘सहप्रवासी’ या म्यूजिकल सिरिज मधील ‘मुखवटे’ या दूसऱ्या भागाचे अनावरण देखील आज करण्यात आले. यावेळी मा. विरोधी पक्ष नेते उज्ज्वल केसकर,अभिनेता संतोष जुवेकर, भारतीय जनता पक्ष कोथरूड मतदार संघाचे अध्यक्ष पुनीत जोशी, चेतन चावडा, निर्मात्या समा जोशी आणि संगीतकार, गायक,अभिनेता दिग्विजय जोशी आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना एस. डी. फिल्म प्रॉडक्शन हाऊसचे दिग्विजय जोशी म्हणाले, आज आपल्याकडे कला क्षेत्राचे उत्तम ज्ञान असलेली भरपूर लोक आहेत. मात्र त्यांना रोजगार नाही. अशा कुशल व होतकरू हातांना रोजगार मिळवून देण्याच्या उद्देशाने एस. डी. फिल्म हे प्रॉडक्शन हाऊस लॉंच करण्यात आले आहे. या मार्फत मराठी चित्रपट, मराठी वेब सिरिज आणि शॉर्ट फिल्मची निर्मिती, तसेच गुजराती चित्रपटांचीही निर्मिती केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर एस. डी. फिल्म प्रेक्षकांसमोर वेगळ्या कथा घेऊन येण्याचे काम करणार आहे. तसेच दरवर्षी एस. डी. फिल्म प्रॉडक्शन हाऊसच्या उत्पन्नातील एक भाग हा समाजकार्यासाठी दान केला जाणार आहे.
पुढे बोलताना दिग्विजय जोशी म्हणाले, यापूर्वी एस. डी. फिल्मच्या वतीने अनेक गाण्यांची निर्मिती करण्यात आली आहे. ती झी किंवा झी म्युझिकसाठी होती. तर नुकतिच एस. डी. फिल्मची निर्मिती असलेली व सुमित कॅसेट वरील ‘सहप्रवासी’ नावाची साडे तीन मिनिटांची एक म्यूजिकल सिरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. त्याचे एकूण पाच भाग असून त्यातील पहिला भाग सहप्रवासी हा रिलीज झाला आहे. तर दूसरा भाग ‘मुखवटे’ लवकरच एस. डी. फिल्मच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.