एरंडवण्यात वृक्षरोपण आणि सीडबॉल्सचे वाटप
इन्फायनाईट व्हेरिएबल व श्री शनी मारुती बाल गणेश मंडळाच्यावतीने विश्व पर्यावरण दिवासानिमित्त एरंडवण्यात वृक्षरोपण करण्यात आले. तसेच, पर्यावरण जागरूकता निर्माण करण्यासाठी सत्राचे आयोजन ही करण्यात आले होते.
जागतिक पर्यावरण दिवस 5 जून रोजी साजरा करण्यात येतो. यानिमित्त इन्फायनाईट व्हेरिएबल व श्री शनी मारुती बाल गणेश मंडळातर्फे सोमवारी पूरग्रस्त वसाहत क्रिडा संकुल येथे वृक्षरोपण करण्यात आले. तसेच, एरंडवणे येथे इन्फायनाईट व्हेरिएबलच्या द बेस येथे पर्यावरण अभ्यासक प्रा. अर्चना कल्याणी यांचे पर्यावरण जागरूकता विषयी सत्र आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमांना पुणे महापालिकेच्या सहयोग लाभला. पूरग्रस्त वसाहत येथील चिमुकल्यांनी पर्यावरणप्रेमी पुष्पा नवले यांच्या मार्गदर्शनखाली बनवलेल्या 1,700 सीडबॉल्सचे वाटप करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष सचिन पवार , अमित गायकवाड, इन्फायनाईट व्हेरिएबलचे संस्थापक अर्णव फडणवीस, कोथरूड युवासेना अध्यक्ष वैभव दिघे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या तिन्ही उपक्रमांना नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
यावेळी रुपाली मगर, गणेश खिरिड, राहुल शेळके, अनिकेत काळे, गणेश शेलार, अभिषेक राठोड आदी उपस्थित होते.