26/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

एमएमयू (मिस्टर अँड मिस युनिव्हर्सिटी) स्पर्धेच्या ‘सीझन २१’मधील विजेते घोषित!

Share Post

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट (एनआयईएम) या इव्हेंट मॅनेजमेंट प्रशिक्षण संस्थेच्या पुण्यातील शाखेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘मिस्टर अँड मिस युनिव्हर्सिटी सीझन २१’ (एमएमयू) या स्पर्धेचा नुकताच समारोप झाला. संस्थेच्या पुणे विभागीय अंतिम फेरीत शहरभरातील स्पर्धकांनी आपल्या प्रतिभेचे, कौशल्यांचे आणि सौंदर्याचे प्रदर्शन केले.’एनआयईएम’द्वारे आयोजित या युवा स्पर्धेमध्ये महाविद्यालयीन जीवनातील सौंदर्य आणि चैतन्य साजरे होते. केवळ विद्यार्थ्यांसाठीची जगातील एकमेव विद्यार्थी सौंदर्यस्पर्धा म्हणून तिचे ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये विशेष स्थान आहे. तरुण आणि महत्त्वाकांक्षी व्यक्तींना ग्लॅमरच्या जगात आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करण्यासाठीचे हे एक उत्तम व्यासपीठ आहे. यंदाच्या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी आपली प्रतिभा, आपले समर्पण आणि उत्कटता यांचे प्रदर्शन केलेच, त्याशिवाय उत्कृष्टता आणि नवोन्मेषाला चालना देण्याच्या ‘एनआयईएम’च्या कटिबद्धतेचे मूर्त रूपही सादर केले. परीक्षकांच्या पॅनेलने कठोर निकषांच्या आधारे निवड केल्यानंतर स्पर्धेतील विविध श्रेणींमध्ये गुणवान विद्यार्थी स्टार म्हणून उदयास आले. ‘मिस युनिव्हर्सिटी’ या श्रेणीत मोहिनी क्षीरसागर ही विद्यार्थिनी विजेती ठरली. तनिषा साठे आणि ईश्वरी गोंदकर या दोघींना द्वितीय व तृतीय पारितोषिक मिळाले. ‘मिस्टर युनिव्हर्सिटी’ या गटात प्रेम गोलांडे हा विद्यार्थी विजेता ठरला. करण मस्के याला दुसरे आणि आरुष बागडे याला तिसरे पारितोषिक मिळाले. ‘कॉलेज आयडॉल’ या स्पर्धेचे विजेतेदेखील याप्रसंगी घोषित झाले. यामध्ये ‘द एंडलेस क्रू’ या संघाने अव्वल स्थान पटकावले, ‘एंजेल्स क्रू या संघाला द्वितीय स्थान मिळाले, तर ‘आनंद ब्रॉडवे बी बॉइज’ या संघाने तृतिय स्थान मिळवले. याप्रसंगी बोलताना ‘एनआयआएम’च्या पुणे येथील केंद्राचे प्रमुख व अखिल भारतीय फ्रँचायझी प्रमुख डॉ. कर्ण उपाध्याय म्हणाले, “स्पर्धेतीय विजेत्यांनी केवळ कौशल्येच सादर केली नाहीत, तर इव्हेंट उद्योगातील ज्या मूल्यांची जपणूक एनआयईएम करते, त्यांची सखोल जाणीवही त्यांनी करून दिली.” या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांसह अन्य काही मान्यवरही उपस्थित होते. सनी निम्हण (सनीज वर्ल्डचे मालक), डेझी शाह (बॉलिवूड अभिनेत्री), विशाल मल्होत्रा (प्रसिद्ध अभिनेते व मॉडेल), शरद सांकला (टीएमकेओसी या मालिकेत अब्दुल ही व्यक्तिरेखा सादर करणारे अभिनेते) आणि अथर्व सुदामे (डिजिटल इन्फ्लुएंसर) यांचा या मान्यवरांमध्ये समावेश होता. संदीप सोपारकर (प्रख्यात नृत्यदिग्दर्शक), प्रणव मिश्रा (बॉलिवूड अभिनेता – केरळ स्टोरी फेम), प्रियदर्शिनी इंदलकर (हस्य जत्रा फेम), श्याम माशाळकर (अभिनेते व मॉडेल), संदीप धर्मा (प्रख्यात फॅशन कोरिओग्राफर) आणि सुभाष धांग (प्रख्यात डान्स कोरिओग्राफर) यांनी या कार्यक्रमात परीक्षकांची भूमिका बजावली. ‘मिस्टर अँड मिस युनिव्हर्सिटी सीझन २१’ या स्पर्धेने विजेत्यांना पारितोषिके दिलीच, त्याशिवाय इव्हेंट मॅनेजमेंटच्या जगात उत्कृष्टता आणि सक्षमीकरणासाठी एनआयईएम कटिबद्ध असल्याची ग्वाहीदेखील दिली. पुढील काळात अधिक तेजस्वी होण्याचे आश्वासन देत या संस्थेचा प्रवास सुरूच आहे. इव्हेंट उद्योगात सक्षम तरुणांना उतरवून त्यांच्या प्रतिभेच्या उत्कर्षासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यास संस्था कटिबद्ध स्थिर आहे.