एमआयटी डब्ल्यूपीयू व ऑटो क्लस्टर डेव्हलपमेंट अँड रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये सामंजस्य करार
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि चिंचवड येथील पॉलिमर ऑटो क्लस्टर डेव्हलपमेंट अँड रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्यात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. या करारावर ऑटो क्लस्टर डेव्हलपमेंट अँड रिसर्च इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापकीय संचालक किरण के वैद्य आणि एमआयटी डब्ल्यूपीयूचे प्र कुलगुरू डॉ.मिलिंद पांडे, कुलसचिव डॉ. गणेश पोकळे, एमआयटी डब्ल्यूपीयूच्या एक्स्टर्नल अफेयर्सचे असोसिएट डीन डॉ. वसी शेख यांनी हस्ताक्षर केले. हा करार रसायनशास्त्र विभागाने अंमलात आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे
या सामंजस्य करारामुळे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण, इंटर्नशिप, प्रकल्प, कार्याशाळा आणि उद्योजकता मार्गदर्शनात मदत मिळेल. तसेच भविष्यात आयोजित केल्या जाणार्या औद्योगिक संमेलनांमध्ये महत्वाची भूमिका बजावेल. तसेच एमएमसी इंडस्ट्रियल पॉलिमर केमिस्ट्रीच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण, इंटर्नशिप आणि अभ्यास दौर्यासाठी गेल्या दोन वर्षापासून ऑटोक्लस्टरमधील सुविधांचा वापर केला आहे.
ऑटो क्लस्टरमध्ये ऑटोमोटिव्ह आणि अभियांत्रिकी क्षेत्रासाठी उत्कृष्ठ सुविधा आहेत. हा विभाग भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयामार्फत स्थापित केला आहे. तसेच, याला महाराष्ट्र सरकारचेही समर्थन आहे.
