NEWS

एमआयटी डब्ल्यूपीयूत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती साजरी

Share Post

प्रबुद्धनायक महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कवि सुरेश भट यांनी माऊली ही उपमा दिली. हे एक विभूती आहेत. महामानवांने विश्वधर्म, मानवकल्याण आणि जातिभेदाच्या भिंती ओलांडून संपूर्ण मानवजातीला एकत्र करण्याचे महत्कार्य केले आहे. आज मानवतावादी विश्वधर्माचे आरचण करण्याची गरज आहे. भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्वज्ञानाचे पालन करावे. असे विचार एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे, भारतचे संस्थापक-अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी काढले.
प्रबुद्धनायक महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची१३२ वी जयंती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या वतीने साजरी केली. या प्रसंगी आचार्य सोनाग्रा लिखित पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. तसेच महामानव या चित्रपटाचा शुभमुहूर्त केला.
याप्रसंगी एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्रकार प्रा. रतनलाल सोनग्रा, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एस.एन.पठाण, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरु डॉ. रविकुमार चिटणीस, कवि डॉ. संजय उपाध्ये, कवी सुरेश भटांचे शिष्य दिपक करंदीकर, कल्पना भागवत, विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख प्रा. विनोद जाधव उपस्थित होते.
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, गेल्या चार दशकांपासून विविध कार्यांच्या माध्यमातून मानवतावादी विश्वधर्माची स्थापना व्हावी याकरीता आम्ही प्रयत्न करीत आहोत. डॉ. आंबेडकर यांचे पंचशील जीवनात उतरवावे. महात्मा फुले, डॉ. आंबेडकर आणि शाहु महाराज यांनी खू मोठे सामाजिक परिवर्तन आणले आहे. त्यानी दाखविलेल्या मार्गावर सर्वांना चालण्याचे आवाहन त्यांनी केेले.
प्रा. रतनलाल सोनाग्रा म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा हा संदेश मानवजातीला दिला आहे. ते दलिताचे नेते न राहता सर्व सामान्यांचे कैवारी बनले. त्यांनी विश्वधर्माचा संदेश पसरविला.
राहुल विश्वनाथ कराड म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर एमआयटी संस्था कार्य करीत आहेत. त्यांनी सांगितलेले राजकारण या विषयाला धरून जून महिन्यात राष्ट्रीय विधायक परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. याद्वारे आमदारांना लोकशाहीचा खरा अर्थ समझावून सांगण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
डॉ. आर.एम.चिटणीस म्हणाले, डॉ. आंबेडकर यांनी ६४ विषयात डिग्री घेतली आहे. त्यांना ९ भाषा अवगत होते. अर्थशास्त्रामध्ये त्यांनी केलेले कार्य अप्रतिम आहे.
या नंतर डॉ. पठाण, डॉ. संजय उपाध्ये कल्पना भागवत आणि प्रा. दत्ता दंडगे यांनी विचार मांडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *