‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठात रक्तदान शिबीर
एमआयटी आर्ट डिझाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणेच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने शहर परिसरात फैलावलेल्या डेंग्यू या आजाराच्या तीव्रतेमुळे रुग्णालयांत वाढत असलेल्या रक्त आणि रक्तपेशींचा तुटवडा लक्षात घेता नुकतेच भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. आपल्या विविध सामाजिक उपक्रमांच्या आयोजनातून समाजाला कायमच सकारात्मक संदेश देणाऱ्या एमआयटी एडीटी विद्यापीठाने पुन्हा एकदा समाजाची गरज ओळखून रक्तदात्यांना साद घातली अन् त्याला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला. विद्यापीठाच्या संकुलात झालेल्या या रक्तदान शिबिरात तब्बल २७५ दात्यांनी रक्तदान केले. या कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डाॅ.रामचंद्र पुजेरी, कुलसचिव डॉ. महेश चोपडे यांच्या हस्ते करण्यात झाले. यावेळी संगणक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संचालक डॉ. रजनीश कौर सचदेव-बेदी, अभियांत्रिकी शाखेचे संचालक डॉ. वीरेंद्र शेटे, ‘मॅनॅट’चे उपप्राचार्य प्रा. श्रीकांत गुंजाळ, सहाय्यक कुलसचिव श्री. विशांत चिमटे, विद्यार्थी कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. सूराज भोयार, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा. विशाल पाटील सर्व कार्यक्रम आधिकारी आणि सर्व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते.रक्तदान शिबिराचे उद्घाटन करताना, डाॅ.पुजेरी यांनी म्हणाले, रक्तदान ही काळाजी गरज असून, विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेने रक्ताचा तुटवडा ओळखून केलेले शिबिराचे आयोजन व त्याला लाभलेला उदंड प्रतिसाद उल्लेखनिय आहे. या शिबिराच्या माध्यमातून हजारों लोकांना जिवदान मिळणार आहे. तसेच, डाॅ. चोपडे यांनीही यावेळी रक्तदात्यांचे अभिनंदन करताना कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.