NEWS

एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटीची कॅडेट तुषारा थुम्मलापल्ली हिने बोट पुलिंगमध्ये जिंकले राष्ट्रीय कांस्य पदक

Share Post

एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या एमआयटी स्कूल मॅकॅनिकल विभागाच्या तिसऱ्या वर्षात शिकत असलेली कॅडेट तुषारा थुम्मलापल्ली, हिने नुकतेच विशाखापट्टणम येथे झालेल्या एऩसीसी अखिल भारतीय एनएयु (NAU) सैनिक शिबिरात बोट पुलिंगमध्ये राष्ट्रीय कांस्य पदक जिंकले. हे पदक लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंग यांच्या हस्ते पदक प्रदान करण्यात आले.
तुषाराने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत बोट पुलिंगमध्ये राष्ट्रीय कांस्यपदक जिंकले. तिने बोट पुलिंगमध्ये राज्य सुवर्णपदक, बोट रिगिंगमध्ये राज्य रौप्य पदक आणि आंतरगट स्पर्धेत सीमनशिप प्रॅक्टिकलमध्ये राज्य कांस्य पदक जिंकले आहे.
एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ.मंगेश कराड यांनी राष्ट्रीय पुरस्कार मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत म्हणाले की एनसीसी ही देशातील तरुणांना साहस, शिस्त आणि सन्मानाने भरलेले जीवन त्यांच्यामध्ये नेतृत्व आणि सौहार्दाची भावना निर्माण करून देते.
एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष व कुलगुरू प्रा.डॉ.मंगेश कराड, प्र-कुलगुरू डॉ.अनंत चक्रदेव, कुलसचिव डॉ.महेश चोपडे, डॉ.सुदर्शन सानप, डॉ.अजयकुमार उगले, यांनी तुषाराचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *