एन. ई .एस हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर यांच्या संयुक्त विद्यमाने पाणी आडवा पाणी जिरवा उपक्रम
निमसाखर येथील प्रगतशील बागायतदार श्री जयंत विजयराव मोरे यांच्या शेतालगच्या ओढ्यात वनराई बंधारा पाणी आडवा पाणी जिरवा हा उपक्रम कृषी विभाग इंदापूर व एन. ई .एस हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम घेण्यात आला.
सदर उपक्रमाबद्दल संस्था सचिव श्री धनंजय रणवरे म्हणाले की अशा प्रकारचे उपक्रम होणे ही अत्यंत काळाची गरज आहे नक्कीच या माध्यमातून पाणी अडवले जाईल व त्याचा फायदा परिसरातील शेतकरी बांधवांना होईल असेही ते म्हणाले. संस्था उपाध्यक्ष श्री संजय रणवरे उर्फ पप्पू भैया यांनी उपक्रमाचे कौतुक केले .इंदापूर तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब रुपनवर यांनी आपले मत व्यक्त करताना म्हणाले की या बंधार्यावर जवळपास 50 ते 60 एकर रब्बी पिकांना पाणी मिळेल. व वाहणाऱ्या पाण्याचा वेग कमी होऊन पाणी जमिनीत मुरण्यास मदत होईल. यावेळी मंडल कृषी अधिकारी सतीश महानवर यांनीही मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री चंद्रकांत रणवरे व कनिष्ठ महाविद्यालयाचे व प्रमुख चंद्रकांत बलभीम बोंद्रे सर तसेच इंदापूर कृषी अधिकारी योगेश फडतरे सर व व कृषी सहाय्यक श्रद्धा घोडके मॅडम यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्याच बरोबर क्रॉप सायन्स विषयाचे तज्ञ मार्गदर्शक साखरे सर यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमासाठी सौ नगरे मॅडम, निगडे सर भोसले सर तसेच निमसाखर येथील प्रसिद्ध बागायतदार राजेंद्र पवार व राम गोरे यावेळी उपस्थित होते.
सदर उपक्रमाबद्दल प्रगतशील बागातदार जयंत विजय मोरे यांनी सदर वनराई बंधारा चा शेतीच्या पाण्याला याचा नक्कीच फायदा होईल असे मत व्यक्त केले व एन. ई . एस .हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय व कृषी विभागाचे आभार मानले .