एकेकाळी चहासाठी पैसे नसणारा ‘तो’ आज पेटीत पैसे कमवतो
सध्या इन्फ्लुएन्सरचा जमाना आहे. आज असंख्य इन्फ्लुएन्सर सोशल मीडियावर आपला कॉन्टेन्ट घेऊन येत आहेत. अशा या इन्फ्लुएन्सर्स गर्दीत आपले वेगळेपण जपणारे, सिद्ध करणारे दोन इन्फ्लुएन्सर्स म्हणजे नील आणि करण. नुकतीच त्यांनी प्लॅनेट मराठी ओटीटीवरील ‘पटलं तर घ्या विथ जयंती’ या टॉक शोमध्ये हजेरी लावली. यावेळी नीलने प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर होण्याआधीचे एक सत्य उघड केले. एकेकाळी त्याच्याकडे चहा पिण्याइतके पैसेही नव्हते, मात्र आता तो त्याच्या कॉन्टेन्टने पेटीमध्ये पैसे उचलतो. त्याचा इथंवरचा हा प्रवास त्याने यावेळी शेअर केला. यावेळी नीलने नवाजुद्दीन सोबत काम केल्याचा एक भन्नाट अनुभवही शेअर केला, आता तो काय आहे, हे तुम्हाला हा शो पाहिल्यावरच कळेल. नील सोबत करण सोनावणेही या शोमध्ये काही गंमतीजंमती सांगितल्या. करणने त्याच्या महाविद्यालयीन जीवनातील कॉपी करतानाचा किस्सा आणि जेवणाचा किस्सा सांगितला. प्रेक्षकांना येत्या शुक्रवारी ३ मार्च रोजी ‘पटलं तर घ्या विथ जयंती’ चा एपिसोड प्लॅनेट मराठी ओटीटीवर पाहता येईल.