23/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

एएसजी आय हॉस्पिटलमध्ये नेत्रदान पंधरवडा गरजूंसाठी कॉर्नियल प्रत्यारोपण शस्त्रक्रिया मोहीम…

Share Post

दृष्टिहीन लोकांना आपल्या सुंदर जगाचा आनंद अनुभवण्याची संधी देण्यासाठी भारतात दरवर्षी 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर हा राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा साजरा केला जातो. नेत्रदानासाठी लोकांना प्रवृत्त करणे आणि प्रोत्साहित करणे, नेत्र प्रत्यारोपण किंवा नेत्रदानाशी संबंधित विविध गैरसमज दूर करणे या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. एका नेत्रदानामुळे दोन कॉर्निया अंध व्यक्तींना दृष्टी मिळू शकते, तरीही नेत्रांची मागणी आणि पुरवठा यामध्ये खूप अंतर आहे. राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा आमच्या सर्व एएसजी नेत्र रुग्णालयांमध्ये साजरा केला जातो, नेत्रदानाचे महत्त्व समजण्यासाठी सर्वसामान्यांना एका व्यासपीठावर आणण्याबरोबर गरजूंना कॉर्नियल प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सेवा पुरवण्यासाठी हि मोहीम राबवली जात असल्याची माहिती कॉर्नियल सर्जन डॉ. भूपेश जैन, डॉ. आरुषी गोयल आणि डॉ. हेमंत कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी डॉ. पवन चव्हाण, डॉ. कौस्तुभ देशमुख उपस्थित होते.

डॉ. आरुषी गोयल म्हणाल्या की, नॅशनल प्रोग्रॅम फॉर कंट्रोल ऑफ ब्लाइंडनेस (NPCB) नुसार, सध्या भारतात अंदाजे 4,50,000 कॉर्नियल (नेत्रपटल) अंध लोक आहेत. त्यातच दरवर्षी 25000-30000 अतिरिक्त प्रकरणे जोडली जातात. सध्या भारतात दरवर्षी 45,294 डोनर नेत्र संकलन केले जाते. खूप मोठी पोकळी भरून काढायची आहे.

डॉ. भूपेश जैन म्हणाले की, कॉर्नियाचे आजार ग्रामीण लोकांमध्ये जास्त प्रमाणात आढळतात. आम्ही जवळच्या आणि दूरच्या गावांना भेट देण्याचा आमचा मानस आहे. याठिकाणी सर्वोत्तम आरोग्यसेवेचे नेटवर्क उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे. एएसजी आय हॉस्पिटल हे सर्व अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज आहे. तसेच कॉर्निया, डोळयातील पडदा, काचबिंदू, बालरोग आणि ऑक्युलोप्लास्टी सेवांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांची उत्तम टीम आहे.

डॉ. पवन चव्हाण म्हणाले की, डोळ्यांच्या वर एक थर असतो, जो डोळ्यांचा पुढचा भाग झाकण्याचे काम करतो, याला कॉर्निया म्हणतात. डोळ्यांच्या संसर्गामुळे, डोळ्यातील नागीण आणि कोणत्याही प्रकारच्या दुखापतीमुळे कॉर्नियाचे नुकसान होऊ शकते. यावर वेळीच उपचार न केल्यास डोळ्यांची दृष्टी कायमची जाऊ शकते. जेव्हा असे होते, तेव्हा दृष्टी परत मिळविण्यासाठी कॉर्निया प्रत्यारोपण करावे लागते. नेत्रदान न झाल्यामुळे अनेक रुग्ण कॉर्निया प्रत्यारोपण करू शकत नाहीत.

डॉ. कौस्तुभ देशमुख म्हणाले, डोळा हा आपल्या शरीराचा सर्वात संवेदनशील अवयव आहे. याच्याशी संबंधित थोडीशी समस्या देखील मोठ्या आणि गंभीर समस्यांना कारणीभूत ठरू शकते. डोळ्यांच्या कॉर्नियातील दोष देखील दृष्टी काढून टाकू शकतात. त्यामुळे अंधत्व येऊ शकते. त्यामुळे डोळ्यांची विशेष काळजी घेतली पाहिजे.

डोळ्यांवरचे पांढरे डाग / कॉर्निया अंधत्व असलेला कोणताही रुग्ण आमच्याशी 8875020437 या नंबरवर संपर्क करू शकतो