उद्घाटनाच्या दुसऱ्या दिवसापासूनच पुणेकरांचा भिमथडीत ओढा
भीमथडी सिलेक्ट दालनात विविध राज्यांमधील स्टॉल असून त्यामध्ये महाराष्ट्राच्या कोल्हापूरच्या शिवालय महिला बचत गटाच्या टाकाऊ प्लास्टिक मटेरियल पासून बनविलेल्या बॅगा, एम्ब्रॉयडरी, बांबूच्या फ्याब्रिक पासून बाळाचा दुपट्टा, गुजरातचे खादी कपड्यांना नॅचरल रंगाचा डाय, वेस्ट बंगालचा हॅन्डमेड कांता स्टिच , सिल्क कॉटन फ्राब्रिक, फेमस हँडलूमस, राजस्थानी पारंपरिक पेंटिंग, हरियानाचे दलाई क्राफ्ट,
असामची ग्लास बेस ज्वेलरी, तेलंगणाच्या एकत कॉटनचे विविध प्रकार , राजस्थानचे मलमल कॉटन वर्क, आंध्र प्रदेशची लोकप्रिय एकत कलाकारी, दिल्लीचे हॅन्ड ब्लॉक नॅचरल डाय इत्यादी प्रकारच्या विविध कलाकारी भीमथडी सिलेक्ट मध्ये पहावयास मिळत आहेत. भीमथडीत पर्यावरण पूरक देवराई घेते लक्ष वेधून भीमथडीत देवराईमध्ये सुमारे 120 प्रकारच्या देशी वृक्षांची लागवड केली आहे. देवराईमुळे देशी वृक्षांचे मुबलक बीज तयार होते.
देवराई मुळे गावागावात ऑक्सिजन बँक, निसर्गातील विविध परीसंस्थाना संरक्षण, निसर्गाचा समतोल, किडे मुंग्या यांना आश्रय व खाद्य, शेती उत्पनात वाढ असे विविधांगी फायदे मिळतात. झाडांचे हेच महत्व ओळखून ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली मागील 5 दशकात जवळपास 5 लाख वृक्ष लागवड झाली असून आजही भीमथडीच्या माध्यमातून पुणेकरांना वृक्षसंवर्धनाचे महत्व पटवून दिले जात आहे.
भीमथडीत एकात्मिक शेती व्यवस्थापन विभागात पुणेकरांची पावले थांबली व जाणून घेतले शेतीविषयक विविध जोड धंदे, जसे की रेशीम उद्योग, कुकुट पालन, शेळीमेंढी पालन, मत्स्य व्यवसाय, परस बागेतील शेती.आशा जोडधंद्याच्या बळावरच शेती व शेतकरी सक्षम होऊ शकतात यावर भीमथडीचा विश्वास आहे.
दिनांक 25 डिसेंबर पर्यंत सकाळी 10.00 ते सायंकाळी 10.00 वाजेपर्यंत चालणाऱ्या भीमथडी जत्रेला पुणेकरांनी आवर्जून भेट द्यावी असे आयोजकांतर्फे आवाहन करण्यात येत आहे.