उत्कंठावर्धक ‘वेड’ लावणारा टिझर …
टिझर ने ‘वेड’ बॉलीवूडचा आघाडीचा अभिनेता अक्षय कुमारला देखील लावले.अभिनेता रितेश देशमुख यांनी आपले मित्र अक्षय कुमार यांना वेड चा टिझर पाहण्यासाठी पाठवला आणि तो त्यांना इतका आवडला कि त्यांनी आपल्या सोशल मीडिया हॅन्डल्स वरून लगेचच शेअर केला …
२० वर्ष अभिनय कारकीर्द गाजवल्यानंतर अभिनेता रितेश देशमुख एका आगळ्या वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे . ३० डिसेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘वेड’ या त्यांच्या आगामी चित्रपटाचा टिझर नुकताच सोशल मीडियावर शेअर झाला आहे. विशेष बाब म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः अभिनेता रितेश देशमुख यांनी केले आहे तसेच या चित्रपटाद्वारे अभिनेत्री जिनिलिया देशमुख या मराठी चित्रपटात पदार्पण करत आहेत . या पूर्वी जेनेलिया यांनी हिंदी ,तेलगू ,तमिळ ,कन्नड आणि मल्याळम अशा तब्बल ५ भाषिक चित्रपटांमध्ये काम केले आहे .ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ , विद्याधर जोशी
तसेच अभिनेता शुभंकर तावडे व अभिनेत्री जिया शंकर इत्यादी कलाकार या चित्रपटात भूमिका साकारत आहेत . आघाडीचे संगीतकार अजय अतुल यांनी वेड चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केली आहेत . तर गीते अजय – अतुल , गुरु ठाकूर यांनी लिहिली आहेत . वेड चित्रपटाची पटकथा रुषिकेश तुराई, संदीप पाटील, रितेश देशमुख यांनी लिहिली आहे तसेच संवाद प्राजक्त देशमुख यांनी लिहिले आहेत . सिनेमॅटोग्राफी भूषणकुमार जैन यांनी केली आहे संकलनाची जबाबदारी चंदन अरोरा यांनी पार पाडली आहे . संदीप पाटील हे कार्यकारी निर्माते आहेत , जिनिलिया देशमुख यांनी वेड चित्रपटाची निर्मिती केली आहे .
आज या चित्रपटाचा टिझर मुंबई फिल्म कंपनी ने सोशल मीडियावर शेअर केला आहे . रसिक प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता या टिझर द्वारे निर्माण झाली आहे .