29/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स वर्धापन दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळा व व्याखानाचे आयोजन

Share Post

इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स (आयओपी)च्यावतीने रोप्य महोत्सवी वर्षारंभा निमित्ताने डीआरडीओचे माजी संचालक डॉक्टर एम आर पाटकर, युथ आयकॉन आमदार श्री. सत्यजित तांबे पाटील, प्रोफेसर एन एम कुलकर्णी यांचे व्याख्यान आयोजित केले आहे अशी माहिती इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स (आयओपी)चे संचालक प्रोफेसर प्रमोद जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. दर वर्षी प्रमाणे यंदाही संस्था गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार करणार असून सदर कार्यक्रम येत्या रविवारी 30 जुलै रोजी सकाळी 10:00 वाजता.एम इ एस ऑडिटोरियम, बाल शिक्षण मंदिर, मयुर कॅालनी, कोथरूड, पुणे येथे संपन्न होणार आहे. असे प्रोफेसर प्रमोद जाधव यांनी सांगितले. जाधव पुढे म्हणाले, डॉ. एम आर पाटकर यांनी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्याबरोबर वीस वर्ष अग्नी, पृथ्वी, नाग व त्रिशूल या क्षेपणास्रांच्या विकासासाठी काम केलेले आहे. डॉ. पाटकर या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी असणार आहेत. प्रोफेसर प्रमोद जाधव हे फिजिक्सच्या अभ्यासातील कठीण वाटणार्या गोष्टी सोप्या कशा करता येतील व तो कसा करावा याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स तर्फे कोरोना काळात ज्या विद्यार्थ्यांवर अर्थिक संकट आले होते अशांना मदत केली होती. रौप्य महोत्सवी वर्षात्तही गरजवंत विदयार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याबाबतही यावेळी जाहीर केले जाईल असे प्रोफेसर प्रमोद जाधव यांनी सांगितले.