आर.एस.एफ फिटनेस क्लब आता पुण्यात
जीम इक्विपमेंट मध्ये भारतासह परदेशातही नावाजलेला आर एस एफ ब्रॅंड आता फिटनेस क्लब व्यवसायात कार्यरत झाला आहे. आर एस एफ च्या देशातील दुसऱ्या आणि महाराष्ट्रातील पहिल्या फिटनेस क्लबचे उद्घाटन आज पुण्यातील पिंपळे सौदागर येथे सुप्रसिद्ध अभिनेते, बॉडीबिल्डर ठाकूर अनुप सिंग यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुनीत जैन (डायरेक्टर, आर. एस. एफ), सोनू जैन,आदित्य जैन आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना पुनीत जैन म्हणाले, भारतासह परदेशातही आर एस एफ ब्रॅंडची जीम इक्विपमेंट प्रसिद्ध आहेत. या क्षेत्रात आम्ही मागील दहा वर्षांपासून कार्यरत असून २ हजार ८०० हून अधिक जीम मध्ये आमची उत्पादने वापरली जातात. आता आम्ही प्रत्यक्ष जीम उभारून एक नवीन पाऊल टाकले आहे. चंदीगड येथे आमची पहिली जीम सुरू करण्यात आली आहे, चंदीगड आणि पुण्यातील ही जीम डायरेक्ट कंपनीच्या मालकीच्या असून आम्ही या व्यवसायात फ्रॅच्यायसी सुरू करणार आहोत त्यासाठीही पुण्यातील हा आमचा फिटनेस क्लब मॉडेल आहे. या फिटनेस क्लब मध्ये फक्त फिटनेसचे धडे मिळणार नाहीत तर त्या पलीकडे जाऊन ‘फिट इंडिया’ मोहीम आम्ही राबवण्याचा प्रयत्न करत आहोत. जीम मध्ये असलेल्या ट्रेनर्सचे ट्रेनिंग, त्यांना सर्टिफिकेट कोर्स आम्ही ‘आर एस एफ ट्रेनिंग सेंटर’ या माध्यमातून सुरू करत आहोत, तसेच इथे फिटनेस प्रेमी, अन्य जीम व्यवसायिक यांना आर एस एफ कंपनीचे इक्विपमेंट सुद्धा खरेदी करता येतील. अधिक माहिती देताना पुनीत जैन म्हणाले, आर एस एफ च्या माध्यमातून आता सर्व सुविधा एकत्र दिल्या जाणार आहेत. भविष्यात पुण्यात अन्य भागात व इतर शहरात विस्तार करण्याचा आमचा मानस आहे. ‘फिट इंडिया’ ला प्रोत्साहान देण्यासाठी आम्ही अत्यंत वाजवी दरात मासिक आणि वार्षिक मेंबरशिप देत आहोत. या प्रसंगी बोलताना ठाकूर अनुप सिंग म्हणाले, पुण्यात येण्याचा अनुभव नेहमीच सुखद असतो. माझे महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झालेले असल्याने या शहराशी माझे एक अतूट नाते निर्माण झालेले आहे. आज आर एस एफ जीमच्या उद्घाटनासाठी आलोय त्यामुळे फक्त एक गोष्ट सांगेन की तुम्हाला फिट राहायचे असेल तर जीम करणे आवश्यक आहे. व्यायाम आणि त्याला प्रोटिनयुक्त पौष्टिक आहाराची जोड असेल तरच आपण फिट राहू शकतो ही बाब लक्षात ठेवा कारण जीम केली आणि आपले डायट व्यवस्थित नसेल तर त्याचा उपयोग होत नाही , दैनंदिन कामाच्या व्यसतेमुळे आपल्या आहारात सर्व आवश्यक घटकांचा समावेश नसतो यामुळे सप्लीमेन्ट गरजेचे असतात असेही ठाकूर अनुप सिंग यांनी नमूद केले. तसेच अभिनयाच्या बाबतीत बोलताना लवकरच एका हिंदी चित्रपटात झळकणार असल्याचे त्यांनी सांगितले.