आर्टक्राफ्ट्स अबुधाबी, दुबई या संस्थेकडून पुण्यात आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धा उत्साहात संपन्न
आर्टक्राफ्ट्स अबुधाबी, दुबई या संस्थेकडून आयोजित आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत पुण्याची बाल चित्रकार साक्षी सचिन शिरोडे, वय वर्ष १२, इयत्ता सातवीत शिकणारी, हिला क्रिएटिव्ह आर्टिस्ट असा सन्मान मिळाला आहे. या स्पर्धेत साधारणपणे २० देशभरातून आणि ३५० हून अधिक चित्रकारांनी सहभाग घेतला होता . स्पर्धा दोन गटात झाली.
यामध्ये आर्टक्राफ्ट्स अबुधाबी, दुबई या संस्थेने मेरे अपने राम ह्या विषयावर स्पर्धा आयोजित केली होती. जगभरातील नावीन्यपूर्ण तसेच वैशिषटयपूर्ण कलात्मक प्रतिमेला आणि युवा कलाकारांना प्रोत्साहन देणे या उद्देशाने चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. १८ वर्षाखालील एक गट, तर १८ वर्षांवरील चित्रकरांसाठी एक गट होता. साक्षीला क्रिएटिव्ह आर्टिस्ट म्हणून सन्मान मिळाला आहे. ३५० मुलांमधून प्रथम १० क्रमांकमध्ये साक्षीची निवड करण्यात आली आणि तिला आंतरराष्ट्रीय स्तराचे सन्मानपत्र मिळाले आहे. आतापर्यंत साक्षीने पुणे शहर विभागातून, राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अनेक बक्षिसे मिळवून यश संपादन केले आहे. त्यामुळे आई वडील साक्षीच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करत आहेत.