18/07/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

आय स्प्राउटने पुण्यात उघडले आपले प्रीमियम सेंटर

Share Post

व्यावसायिक उपक्रमांनाच जागा देऊन मोठ्या प्रमाणात प्रीमियम फॅसिलीटी आणि सेवा प्रदान करणारे कार्यक्षेत्र. पुणे, १६ फेब्रुवारी, २०२३: आय स्प्राउटने ने पुण्यासारख्या शहरातील ऑफिस वर्कस्पेसेसची वाढती मागणी पाहता, मॅनेज्ड ऑफिस स्पेसेसच्या संकल्पनेला चालना देणारे आय स्प्राउट बिझनेस सेंटर सुरू केले आहे. पंचशील टेकपार्क वन, टॉवर सी, दुरसा मजला, येरवडा, पुणे येथे हे प्रीमियम सेंटर सुरू करण्यात आले असुन हे त्यांचे भारतातील ११ वे सेंटर आणि पुण्यातील दुसरे सेंटर आहे. पुण्यातील त्यांचे पहिले सेंटर २०२२ च्या सुरवातीस उघडण्यात आले होते, जे की धोरणात्मकदृष्या पुण्यातील टेक कंपन्या आणि बिझनेस पार्क्सच्या दृष्टीने सर्वात चांगल्या लोकेशन मध्ये स्थित आहे. या प्रीमियम सेंटरच्या लॉंच प्रसंगी पंचशील रियल्टीचे चेअरमन अतुल चोरडिया हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. टेकपार्क वन मधील आय स्प्राउट अंदाजे २५,००० चौरस फूटांचे असुन यामध्ये ४५० सीट्सची क्षमता आहे. को वर्किंग स्पेस मधील प्रमुखांपैकी एक आय स्प्राउट हे अतीशय नाविन्यपूर्ण संकल्पनेतुन बनवण्यात आले आहे, जिथे क्रिएटीव्ह कॉनर्स, आरामदायी आसनव्यवस्था आणि क्लायंट फ्रेंडली प्लॅन पहावयास मिळतात. जे की इतर कोणत्याही को वर्किंग स्पेसपेक्षा वेगळे ठरते. या प्रसंगी अतुल चोरडिया म्हणाले की, “गेल्या काही वर्षांपासून साथीच्या रोगामुळे घरातुनच काम करण्याचे प्रमाण वाढले आहे परंतु आता कार्यालयीन संस्कृतीला पुन्हा एकदा चालना देण्याची वेळ आली आहे. आय स्प्राउटच्या या पुढाकारामुळे कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यास प्रोत्साहन मिळेल व निरोगी वातावरणातील कार्यालयांमध्ये काम करण्याचा आनंद मिळेल. आपल्या दैनंदिन जीवनावर प्रभाव पाडणार्या , ट्रॅफिकने भरलेल्या या जागतिकीकरणाच्या जगात कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण, आकर्षक केबिन्स या गोष्टी कार्यालयीन संकल्पनेस पुन्हा आणण्यात मदत करतील, जे की सरकारचेही उद्दिष्ट आहे. आय स्प्राउट बिझनेस सेंटरबद्दल सविस्तरपणे बोलताना, त्यांच्या सीईओ आणि को फाउंडर सुंदरी पतीबंधला म्हणाल्या, “आमची व्यावसायिक इन-हाउस टीम तुमच्या व्यवसाय कल्पनांना प्रत्यक्ष उपक्रमांमध्ये बदलण्यासाठी येथे उपस्थित आहे. याशिवाय, उत्साहवर्धक वर्कस्पेस प्रदान करून,आय स्प्राउट ग्राहकांच्या गरजांनुसार व्यवसायीक सेटअप आणि व्यवस्थापनात मदत करते. आमच्या देशव्यापी मोहिमेचा एक भाग म्हणून, हैदराबाद, विजयवाडा, चेन्नई, पुणे, बंगलोर नंतर, लवकरच नोएडा, गुडगाव, कोलकाता, अहमदाबाद आणि मुंबईमध्ये प्रवेश करण्याची आमची पुढील योजना आहे.” त्या पुढे म्हणाल्या, “देशातील विविध प्रकारच्या उद्योगांमध्ये, मुख्यतः आयटी/आयटीईएस, आर अॅण्ड डी आणि सर्व प्रकारच्या स्टार्ट-अप्स मध्ये होणार्या वाढीसोबत कार्यक्षेत्राची संकल्पना देखील आपल्या अंदाजापेक्षा कितीतरी अधिक वाढेल.” श्रीनी तिरधला, को फाउंडर आणि सीएमओ म्हणाले, “२०२४ पर्यंत आय स्प्राउटची किमान ५० सेंटर बनवण्याची योजना आहे जी की २ मिटर स्केअर फूट ऑफिस स्पेससह बनवण्यात येतील, ते पुढे म्हणाले की ग्राहकांसाठी सर्वसमावेशक तपशील, सर्वोत्कृष्ट किंमत, योग्य आणि सोप्या पद्धत्तीने केले जाणारे डॉक्युमन्टेशन आमची वैशिष्ट्ये आहेत जी आम्हाला आमच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा वेगळे करतात. आम्ही १ मिलियन स्केअर फुटांची विस्तार योजना आखत आहे त्याचबरोबर कोलकाता, अहमदाबाद, गुडगाव आणि मुंबई येथे नवीन केंद्रे आणत आहोत. जानेवारी २०२२ पर्यंत को-वर्किंग प्लेस मार्केट खरोखरच तेजीत होते, आमच्याकडे अगोदर २.५ लाख स्केअर फूट जागा होती आता १२ महिन्यांत ती ६.५ लाख स्केअर फूट झाली आहे. आत्तापर्यंत काही स्टार्टअप्ससह, उबेर, डेल, ह्युंदाई, आर्सेलर मित्तल आणि इतर बहुराष्ट्रीय कंपन्या आमचे ग्राहक आहेत.”