आपल्या स्वभावापेक्षा वेगळी भूमिका साकारण्यात एक वेगळी मजा – अभिनेत्री कविता लाड – मेढेकर
आत्तापर्यंत माझ्या वाट्याला हसऱ्या, सोशीक अश्याच भूमिका आल्या पण आता काही वेगळं करायला मिळत आहे. आपल्या स्वभावापेक्षा वेगळी भूमिका साकारण्यात एक वेगळी मजा असते. ते आव्हानात्मक देखील आहे. भूवनेश्वरी हे पात्र साकारताना कोल्हापूरी टोन पकडून मला बोलाव लागतं, एक वेगळा अॅटीट्यूड कॅरी करावा लागतो. तसेच सीन करताना तो आधी मला इमॅजिन करावा लागतो व नंतर तो सीन मी करते. त्यामुळे इतक्या वर्षा नंतर देखील मला रोज नवीन काहीतरी शिकायला मिळत आहे. याचा एक वेगळाच आनंत मला आहे, अशा भावना अभिनेत्री कविता लाड-मेढेकर यांनी व्यक्त केल्या.
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही नवी मालिका झी मराठीवर सध्या सुरू आहे. या मालिकेमधून अभिनेत्री कविता लाड-मेढेकर अनेक वर्षांनंतर प्रेक्षकांच्या भेटीस आल्या असून या मालिकेत त्या भूवनेश्वरी हे पात्र साकारत आहेत. पुण्यात एका कार्यक्रमा निमित्त आल्या असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
कविता लाड-मेढेकर म्हणाल्या, मी आत्ता पर्यंत केलेल्या भूमिकेपेक्षा ही भूमिका खूप वेगळी आहे. माझ्या स्वभावांपेक्षा पूर्णपणे वेगळी अशी ही ग्रे शेड असलेली भूमिका आहे. कविता आणि भूवनेश्वरी यांमध्ये फक्त एकच साम्य आहे की एखादी गोष्ट त्यांनी ठरवली की ती पूर्ण करतातच. अनेकदा मला विचारलं जात भूवनेश्वरीला शिक्षणाचा इतका राग का आहे? शिक्षणाचा कोणाला राग असू शकतो का? पण तिला शिक्षणाचा राग का आहे? याचा उलगडा ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेच्या येणाऱ्या भागात प्रेक्षकांना होईल.
कविता लाड-मेढेकर यांच्यासह ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत शिवानी रांगोळे आणि हृषिकेश शेलार यांच्या देखील प्रमुख भूमिका आहेत. कोल्हापुरात होणाऱ्या या मालिकेचं लेखन केलंय मधुगंधा कुलकर्णी हिने तर मालिकेचे दिग्दर्शक आहेत चंद्रकांत गायकवाड. शर्मिष्ठा राऊत या मालिकेच्या निमित्ताने प्रथमच निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. त्यामुळे ही मालिका प्रेक्षकांना भावेल यात शंकाच नाही.
शाळेत मास्तरीण आणि घरात कारभारीण, पाठ होईल का ह्याला संसाराचा पाढा नवी मालिका “तुला शिकवीन चांगलाच धडा” सोमवार ते शनिवार रात्री ८ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.