NEWS

आनंदा डेअरीची उत्पादने पुण्यात 3000 स्टोअर्समध्ये उपलब्ध

Share Post

आनंदा डेअरी लिमिटेड ही भारतातील डेअरी क्षेत्रातील सुप्रसिद्ध दूध आणि दुग्धजन्य पदार्थ उत्पादन आणि विक्री करणारी कंपनी आहे. नुकतेच आनंदा डेअरीचे उच्च दर्जाचे दुग्धजन्य पदार्थ जसे पनीर, फ्लेवर्ड दूध, रबडी आणि मिठाई महाराष्ट्रातील पुणे शहराच्या पवित्र भूमीवर लॉन्च करण्यात आले. ही उत्पादने पुणे शहरातील सुमारे ३ हजार किराणा दुकान व खाद्य पदार्थ विक्री दुकान (जनरल स्टोअर्स) मध्ये विकली जात आहेत, अशी माहिती आनंदा डेअरीचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक डॉ.राधेश्याम दीक्षित यांनी पत्रकार परिषदेत दिली.आनंदा डेअरीची उत्पादने पुण्यात 3000 स्टोअर्समध्ये उपलब्ध

पत्रकार परिषदेला आनंदा डेअरीच्या संचालक सुनीता दीक्षित, संचालक सूरज दीक्षित आदी उपस्थित होते.

सुनीता दीक्षित म्हणाल्या, अगदी कमी कालावधीत आनंदा डेअरीच्या शुद्ध आणि आरोग्यदायी उत्पादनांना पुण्यातील ग्राहकांनी भरभरून दाद दिली. आनंदा डेअरीची उत्पादने अतिशय उत्कृष्ट दर्जाची आहेत. आनंदा डेअरीने शुद्ध आणि चविष्ट दुग्धजन्य पदार्थ उपलब्ध करून देण्याबरोबरच शेकडो तरुणांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे रोजगार देण्याचे काम केले आहे.

सूरज दीक्षित म्हणाले, आनंदा डेअरीने आपले सर्व उच्च दर्जाचे दुग्धजन्य पदार्थ बाजारात उपलब्ध करून दिले आहे. आगामी काळात २ लाख लिटर दूध व दुग्धजन्य पदार्थांची विक्री करण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले असून, हे उद्दिष्ट गाठण्यासाठी सुमारे ८०० ते १००० तरुणांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. आनंदा डेअरी लिमिटेडची उत्पादने भारताबाहेर तब्बल २० देशात निर्यात केली जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

आनंदा डेअरीची उत्पादने पुण्यात 3000 स्टोअर्समध्ये उपलब्ध