‘आनंदमार्ग योगा शिबिराचे आयोजन
आनंदमार्ग प्रचारक संघ यांच्यावतीने तीनदिवसीय आनंदमार्ग योगा शिबिराचे आयोजन भोसरी येथे करण्यात आले आहे. अशी माहिती नवअतीतआनंद अवधूत (ट्रेनर रांची प्रमुख), आचार्य सुरेश्वर आनंद अवधूत ( धर्म प्रचार सेक्रेटरी), बाबर सुनील शिवाजीराव, रमेश हिराजी रोकड़े , सुबोध सिन्हा यांनी दिली
०७, ०८, आणि ०९ जुलै २०२३ रोजी भोसरी येथील रोशल गार्डन ( पुणे नाशिक हायवे, धावडे वस्ती, भोसरी, पिंपरी चिंचवड, पुणे) येथे होणार आहे. हे शिबीर सर्वांना मोफत असून यावेळी उपस्थिताना नाष्टा व जेवणाची व्यवस्थाही निःशुल्क आहे. या तीनदिवसीय आनंदमार्ग योगा शिबिरा आत्ममोक्षार्थम जगत् हितायच, आध्यात्मिक, सर्वोच्च आनंद आणि जागतिक कल्याण, मानव सेवा हिच ईश्वर सेवा अशीच आमची आस्था, आचार्य नभातितानन्द अवधूत हे सामाजिक, आध्यात्मिक विषयावर दर्शनशास्त्र, प्रकाश टाकतील. तसेच आसन, प्राणायाम, कौशिकी नृत्य, तांडव नृत्य, साधना, ध्यान, प्रभात फेरी, प्रभात संगीत, कथा किर्तन आदींचा समावेश आहे.
योगशास्त्र हे असे एक शास्त्र आहे की, प्रत्येक व्यक्ती व समाजास शारिरिक, मानसिक व आध्यात्मिक लाभ देने योगा शिबिराचे हेच उद्दीष्ट आहे.आनंदमार्ग प्रचारक संघ १८० देशात शाखा असून विविध आनंदमार्ग प्रचारक संघ मैत्रयी अपार्टमेंट, सर्व्हे नं. ७०, संतोष नगर, कात्रज, पुणे – ४११०४६ येथे शाखा आहे आनंदमार्ग प्रचारक संघचे श्री श्री आनंदमूर्ती हे संस्थापक आहेत.