आज पासून पुण्यात जी 20 डिजिटल DEWG च्या तिसऱ्या बैठकीला सुरुवात
जी 20 डिजिटल DEWG अर्थव्यवस्था कार्यगटाचे अध्यक्ष आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव अल्केश कुमार शर्मा, सचिव यांच्या हस्ते कर्टन रेझर कार्यक्रमात प्रसार माध्यमांना संबोधन
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांच्या हस्ते 12 जून 2023 रोजी उद्घाटन होणार असलेल्या जी 20 डिजिटल अर्थव्यवस्था कार्यगटाच्या तिसर्या बैठकीच्या अनुषंगाने जागतिक डिजिटल सार्वजनिक पायाभूत सेवा सुविधा परिषद
काही इच्छुक देशांसोबत भारत, स्टॅक म्हणजेच लोकसंख्येच्या प्रमाणात अंमलात आणलेले यशस्वी डिजिटल उपाय सामायिक करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्याची अपेक्षा
जागतिक डिजिटल पायाभूत सुविधा (डीपीआय) परिषदेत जागतिक सहभाग – 46 देश आणि अंदाजे 150 परदेशी प्रतिनिधी; 9 देशांचा मंत्रीस्तरीय सहभाग. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम, युनेस्को, जागतिक आर्थिक मंच, जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटना, आशियाई विकास बँक, अर्ध-शुष्क उष्ण कटिबंधांसाठी आंतरराष्ट्रीय पीक संशोधन संस्था, आर्थिक सहकार्य आणि विकास संघटना, संयुक्त राष्ट्र भांडवल विकास निधी , एशिया पीकेआय कन्सोर्टियम, बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशन, इत्यादीसारख्या आंतरराष्ट्रीय संस्था आणि 47 जागतिक डिजिटल नेते सन्माननीय वक्ते म्हणून शिखर परिषदेत सहभागी होणार
जागतिक डिजिटल पायाभूत सुविधा प्रदर्शनात ओळख, देयके , कागदविरहित प्रशासन, डिजिटल कृषी, शिक्षण आणि कौशल्य, आरोग्यसेवा आणि डिजिटल इंडियाचा प्रवास यांचा समावेश असलेल्या 14 अनुभव क्षेत्रांचा अंतर्भाव
प्राधान्य क्षेत्रांवर अधिक विचारमंथन करण्यासाठी जी 20 सदस्यांनी, अतिथी देश आणि आंतरराष्ट्रीय संस्थांना निमंत्रण